जय हनुमान पतसंस्थेस १ कोटीचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:22 IST2021-04-05T04:22:57+5:302021-04-05T04:22:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरातील जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेला २०२०-२१च्या आर्थिक वर्षअखेरीस सर्व तरतुदी करून १ कोटी ...

जय हनुमान पतसंस्थेस १ कोटीचा नफा
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेला २०२०-२१च्या आर्थिक वर्षअखेरीस सर्व तरतुदी करून १ कोटी २ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे संचालक सुनील वैद्य यांनी जाहीर केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तरी या संस्थेचे कुटुंब प्रमुख शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने राबविलेली ध्येयधोरणे कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी केलेले प्रयत्न संस्थेच्या फलदायी ठरले. भगिनी सूक्ष्म कर्जवाटपात जिल्ह्यात संस्था अग्रेसर आहे. लहान उद्योजकांनाही कर्ज देऊन प्रोत्साहन दिले व त्यांच्या व्यवसायाला बळकटी आणली. त्यामुळे या संस्थेत अखेरीस ५३ कोटींच्या ठेवी झाल्या. त्यापैकी एकूण ४० कोटींचे कर्जवाटप केले आहे. संस्थेचा निधी ७ कोटी आहे. वसूल भागभांडवल २ कोटी ४० लाख, गुंतवणूक २२ कोटी ५० लाख आहे. एकूण व्यवसाय ९३ कोटींचा झाला आहे. संस्थेच्या तीन नवीन शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे वैद्य यांनी सांगितले.