पोलिसांसाठी आज जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:59+5:302021-02-05T07:22:59+5:30
सांगली : पोलिसांच्या आराेग्याची काळजी घेत त्यांच्या आरोग्य तपासणीसह त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस दलाने उपक्रम सुरू केला आहे. ...

पोलिसांसाठी आज जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान
सांगली : पोलिसांच्या आराेग्याची काळजी घेत त्यांच्या आरोग्य तपासणीसह त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस दलाने उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार तीन दिवस आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. आज, शुक्रवारी ख्यातनाम डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांनी दिली.
पोलीस अधीक्षक दीक्षित, गेडाम यांच्या संकल्पनेतून पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार शुक्रवारी डॉ. दीक्षित यांचे व्याख्यान होणार आहे. कृष्णा मॅरेज हॉलमध्ये दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबरच सोशल मीडियावरही त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाइनच्या माध्यमातून नागरिकांनीही याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.