इटकरेची वाटचाल कोरोनामुक्तीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:19+5:302021-06-10T04:19:19+5:30
कामेरी : येलूर (ता. वाळवा) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या इटकरे उपकेंद्रात मंगळवारी केवळ एक कोरोनाबाधित सापडला. गेले पाच ...

इटकरेची वाटचाल कोरोनामुक्तीकडे
कामेरी : येलूर (ता. वाळवा) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या इटकरे उपकेंद्रात मंगळवारी केवळ एक कोरोनाबाधित सापडला. गेले पाच दिवस रोज एक याप्रमाणे इटकरे येथे ५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे गावची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे.
१ फेब्रुवारीपासून दुसऱ्या लाटेत मंगळवार ८ जूनअखेर गावात एकूण ९५ कोरोनाबाधित झाले असून ८० जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवार अखेर ५ बाधितांवर होमआयसोलेशनने उपचार सुरू आहेत, अशी माहिती येलूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. पाटील यांनी दिली. ४५पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण ९९ टक्के पूर्ण झाले असून सरपंच वैशाली पवार, उपसरपंच संदीप पाटील, ग्रामसेवक संपत साळुंखे, तलाठी उत्तम कांदेकर यांच्या सहकार्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, आरोग्य सहायक आर. डी. पाटील, एल. के. पाटील, आशा कदम, अंगणवाडी सेविका, शिक्षक-शिक्षिका, ग्रामपंचायत कर्मचारी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.