शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधी लाथ आणि मग साॅरी, असे चालणार नाही; चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:35 IST

इशारा सभा ऑनलाइन घेणार

सांगली : सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सभेत नेत्यांनी लांबलचक भाषणे केली. तुम्ही आमच्या नेतृत्वावर काहीही बोलायचे आणि नंतर साॅरी म्हणायचे, असे चालणार नाही, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी आमदार जयंत पाटील यांना सुनावले. राष्ट्रवादीच्या वाचाळवीर नेत्यांच्या १३३ क्लीप आमच्या हाती लागल्या आहेत. इशारा सभेत त्या स्क्रीनवर दाखविणार, असा इशाराही दिला.पालकमंत्री पाटील हे रविवारी सांगली दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सांगलीत इशारा सभा घ्यायची आमची ठाम भूमिका आहे; पण राज्यात सध्या पावसाने कहर माजवला आहे. शेतकरी अडचणीत आहेत, मराठवाडा-विदर्भात नैसर्गिक आपत्तीचे संकट गडद झाले आहे. अशा वेळी सभेचे स्वरूप बदलता येईल का, यावर गंभीर चर्चा सुरू आहे. सभा ऑनलाइन घेण्याचा विचार आहे.२०१९च्या महापुरावेळी भाजप-युती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही, त्यावेळी जशी मदत दिली तशीच यावेळीही केली जाणार, असे पाटील म्हणाले.

फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहावेदेवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ते उत्तम संघटक आहेत, बुद्धिमान नेते आहेत. त्यांनी २०२९ पर्यंत महाराष्ट्रात राहावे, ही इच्छा चुकीची नाही. त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राला पर्याय नव्हे तर प्रश्न सोडविणारे नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळेच फडणवीस महाराष्ट्रात राहणे, हेच योग्य ठरेल. फडणवीस यांना माहीत आहे, आपण इच्छा व्यक्त करायची असते. शेवटी नेतृत्वाने योग्य-अयोग्यचा निर्णय करायचा असतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrakant Patil slams Jayant Patil: 'Apologies after harm won't work'.

Web Summary : Minister Chandrakant Patil criticized Jayant Patil over leaders' speeches at a Nationalist Congress Party meeting. Patil warned of revealing 133 clips of controversial statements. He also discussed potentially altering an upcoming rally due to the state's flood situation, while assuring assistance to farmers.