भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या प्रवाहात आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:37+5:302020-12-09T04:21:37+5:30

इस्लामपूर : आजही आपल्या देशात भटके विमुक्त समाज उपेक्षित असून, विकासाच्या प्रवाहापासून दूर आहे. भटक्या विमुक्त समाजातील शिकलेल्या, समाजसेवेची ...

It will bring the nomadic society into the stream of development | भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या प्रवाहात आणणार

भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या प्रवाहात आणणार

इस्लामपूर : आजही आपल्या देशात भटके विमुक्त समाज उपेक्षित असून, विकासाच्या प्रवाहापासून दूर आहे. भटक्या विमुक्त समाजातील शिकलेल्या, समाजसेवेची आवड असलेल्या युवकांनी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून आपल्या समाजाला न्याय द्यावा, असे आवाहन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले.

येथील राष्ट्रवादी भवनमध्ये इस्लामपूर शहर भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या पदाधिकारी व सदस्यांची निवड जाहीर करून त्यांचा प्रतीक पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस अ‍ॅड. चिमण डांगे, सरचिटणीस अरुण कांबळे, शहराध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, संदीप पाटील, भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलचे शहराध्यक्ष मोहन भिंगार्डे उपस्थित होते. सेलचे शहराध्यक्ष मोहन भिंगार्डे यांनी स्वागत केले. यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी अशी- संदीप वडार, अनिकेत साठे, श्रीकांत नाथ गोसावी, पांडुरंग कांबळे (उपाध्यक्ष), अजय कांबळे (चिटणीस), मनीष गवळी, जयेश चव्हाण (सरचिटणीस), अमोल चव्हाण (खजिनदार), सूरज पवार (सचिव), अनिल पवार (सहसचिव), वसीम इनामदार, सौरभ सूर्यवंशी (संपर्क प्रमुख) व ४० सदस्यांचा समावेश आहे.

यावेळी सचिन कोळी, स्वरूप मोरे, गोपाळ नागे, शकील जमादार, धीरज भाेसले उपस्थित होते. सूर्याजी पाटील यांनी आभार मानले.

फोटो ओळी- ०८१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज

इस्लामपूर येथे भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, अरुण कांबळे, संदीप पाटील, मोहन भिंगार्डे, गोपाळ नागे उपस्थित होते.

Web Title: It will bring the nomadic society into the stream of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.