श्यामाप्रसाद मुखर्जींमुळेच पंजाब, बंगाल फाळणी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:19+5:302021-07-07T04:33:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : देशाची फाळणी करताना मुस्लीमबहुल प्रदेशानुसार वाटणी करावी असे सूत्र मांडण्यात आले होते. पण, ...

श्यामाप्रसाद मुखर्जींमुळेच पंजाब, बंगाल फाळणी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : देशाची फाळणी करताना मुस्लीमबहुल प्रदेशानुसार वाटणी करावी असे सूत्र मांडण्यात आले होते. पण, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी प्रदेशातील संख्येनुसार विभागणीचा प्रस्ताव ठेवल्याने बंगाल व पंजाब भारतात राहिले, असे मत भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश बिरजे यांनी व्यक्त केले.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती येथील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
बिरजे म्हणाले की, पश्चिम बंगाल हा भाग हिंदूबहुल असल्याने तिथल्या हिंदूंना फाळणीच्या प्रस्तावित सूत्रानुसार पाकिस्तानात जावे लागले असते. तेव्हा श्यामाप्रसाद यांनी प्रदेशानुसार विभागणी न करता प्रत्येक जिल्ह्याची हिंदू-मुस्लीमांची संख्या विचारात घेऊन फाळणी करावी, असा विचार मांडला. हेच सूत्र पंजाबलाही लागू करावे लागले. त्यांनी आग्रह धरल्याने आजचा बंगाल आणि पंजाब असे प्रांत भारतात राहिले. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या या महान कार्याचे सर्व भारतीयांनी कायम स्मरण ठेवले पाहिजे. यावेळी दीपक शिंदे, धीरज सूर्यवंशी, मुन्नाभाई कुरणे, नगरसेवक संजय कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, मोहन वाटवे, गणेश कांबळे, प्रियानंद कांबळे, अविनाश मोहिते, अभयकुमार वाले, गौस पठाण, गणपती साळुंखे आदी उपस्थित होते.