मुख्यमंत्री व्हावे वाटणे स्वाभाविकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:22+5:302021-01-20T04:27:22+5:30
इस्लामपूर : दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र सध्या आमच्या ...

मुख्यमंत्री व्हावे वाटणे स्वाभाविकच
इस्लामपूर : दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र सध्या आमच्या पक्षाकडे हे पद नाही. प्रथम पक्ष व आमदारांची संख्या वाढवावी लागेल. त्यानंतर पक्ष आणि खासदार शरद पवार जो निर्णय देतील, तो आम्हास मान्य असेल, अशी भावना जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
येथील यल्लाम्मा चौकात सातारा वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या संपर्क कार्यालयाचे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी नगरसेवक खंडेराव जाधव, सातारा वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रूपाली जाधव, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, सुभाष सूर्यवंशी, मुनीर पटवेकर उपस्थित होते.
या वेळी पाटील यांची प्रकट मुलाखत झाली. त्याला पाटील यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. कोरोनाच्या संकटाने राज्यासमोर काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. आम्ही मार्ग काढत आहोत. येत्या एप्रिलपासून राज्य पुन्हा झपाट्याने पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
चौकट
चांगला उमेदवार हवा म्हणून जाहिरात द्यावी लागेल!
शिकलेल्या तरुणांनी राजकारणात यायला हवे. अन्यथा काही दिवसांनी चांगला उमेदवार हवा म्हणून जाहिरात द्यावी लागेल. तरुणांनी केवळ चौकाचौकात बॅनर लावण्यापेक्षा जनतेत जाऊन काम करावे. वाळवा तालुक्याच्या प्रगतीचे मूळ बेरजेच्या राजकारणात आहे. संघर्ष संपल्याने प्रगतीवर लक्ष केंद्रित करता आले. राजारामबापूंच्या अकाली निधनानंतर कार्यकर्त्यांनी आईकडे आग्रह धरला आणि मला सार्वजनिक क्षेत्रात यावे लागले, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
फोटो ओळी-१९०१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज
इस्लामपूर येथे सातारा वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी खंडेराव जाधव, रूपाली जाधव, अरुण कांबळे उपस्थित होते.