शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी एका रात्रीत सूत्रे फिरविली, मणिपूरमधील दंगलीतून जतच्या विद्यार्थ्यांची सुटका झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 13:02 IST

मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलाने सुरक्षितस्थळी हलविले

जत : मणिपूर येथील दंगलीत सापडलेल्या जत तालुक्यातील व राज्यातील काही विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एका रात्रीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूत्रे फिरविली. शरद पवार यांच्या तत्परतेमुळे गुरुवारी मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलाने सुरक्षितस्थळी हलविले. त्यामुळे त्यांची दंगलीतून सुटका झाली.मळद (ता. बारामती) येथील प्रल्हाद वरे यांना गुरुवारी सायंकाळी ७ वाजता आवंढी (ता. जत) येथील संभाजी कोडग यांचा फोन आला. त्यांनी त्यांचा मुलगा आयआयआयटी इन्फाळ येथे शिक्षणासाठी आहे. तो त्याच्या बारा मित्रांसह वसतिगृहात राहतो. या वसतिगृह परिसरात ठिकठिकाणी दंगल सुरू आहे. या भयंकर परिस्थितीत काहीही करा; परंतु माझ्या मुलाला व त्याच्या मित्रांना वाचविण्यासाठी प्रयत्न करा, अशी विनवणी केली.वरे यांनी शुक्रवारी सकाळी शरद पवार यांच्याकडे जाऊ, असे सांगत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला; परंतु कोडग यांनी, एवढा पण वेळ नाही कधीही वसतिगृहावर हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. नंतर वरे यांनी कोडग यांना शरद पवार यांचे स्वीय सहायक राऊत यांचा मोबाइल क्रमांक दिला. कोडग यांनी तातडीने राऊत यांच्याशी संपर्क साधत माहिती दिली. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मणिपूरच्या राज्यपालांना फोन करून संबंधित मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी सांगितले.त्यानंतर रात्री १२ वाजता भारतीय सैन्य दलाच्या चीफ कमांडरांनी कोडग यांचा मुलगा मयूर कोडग याच्याशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांनी सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

टॅग्स :SangliसांगलीSharad Pawarशरद पवारStudentविद्यार्थी