शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: दारू पिण्यास पैसे न दिल्याने भंगार विक्रेत्याचा खून झाल्याचे स्पष्ट, संशयित आरोपीस दोन दिवसांची कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:21 IST

काठीने मारहाण करून प्लॅटफॉर्मवर ढकलून दिले

मिरज : मिरज रेल्वेस्थानकात सतीश बाबुराव मोहिते या भंगार विक्रेत्याचा खून दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संतोष दुर्गा निंबाळकर (तिवटणा, ता. सोनपेठ, जि. परभणी) यास अटक केली असून न्यायालयाने त्यास दोन दिवस कोठडी दिली.मिरज रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म नं. २ वर आरोग्य निरीक्षक कार्यालयासमोर सोमवारी रात्री सतीश मोहिते याचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला. मृत सतीश मोहिते हा मिरज रेल्वेस्थानक परिसरात भंगार बाटल्या गोळा करत होता. सोमवारी रात्री नऊ वाजता सतीश मोहिते प्लॅटफॉर्मवर बसला असता सतीश याच्याप्रमाणेच भंगार व्यवसाय करणाऱ्या संतोष निंबाळकर याने दारू पिण्यासाठी सतीशकडे पैसे मागितले. सतीश याने पैसे देण्यास नकार दिल्याने संतोष याने त्यास काठीने मारहाण करून प्लॅटफॉर्मवर ढकलून दिले. यामुळे डोक्याला मार लागून सतीश गंभीर जखमी झाला.यावेळी पळून जाणाऱ्या संतोष यास योगेश चव्हाण यांनी तेथे अडवून ठेवले. याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सतीश यास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तेथे उपचारापूर्वीच सतीश याचा मृत्यू झाला. डोक्याला मार लागल्याने सतीश याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले.

मिरज रेल्वे पोलिसात संतोष निंबाळकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. मृत सतीश यांची पत्नी दीपाली सतीश मोहिते (रा. इचलकरंजी रोड, हातकणंगले) यांनी संतोष याच्या विरुद्ध पतीच्या खुनाची फिर्याद दिली आहे. मिरज रेल्वे पोलिस अधिक तपास करीत आहेत.