पर्यावरणाचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST2021-02-10T04:26:00+5:302021-02-10T04:26:00+5:30

नेर्ले : आजूबाजूच्या डोंगरावरती गवताला आग लागणार नाही याची काळजी घ्या. पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपलं कर्तव्य आहे, ...

It is everyone's duty to conserve the environment | पर्यावरणाचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य

पर्यावरणाचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य

नेर्ले : आजूबाजूच्या डोंगरावरती गवताला आग लागणार नाही याची काळजी घ्या. पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपलं कर्तव्य आहे, असे मत वनपाल अमोल शिंदे यांनी व्यक्त केले.

ते नेर्ले येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात वनवणवा सप्ताहाच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर, सरपंच छायाताई रोकडे, मुख्याध्यापक एस.एन. निकम यांची उपस्थिती होती.

यावेळी शिंदे म्हणाले, वनसंवर्धन करणे, त्याची काळजी घेणे हे माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे. पृथ्वीवर आपणास जगण्याचा अधिकार आहे. निसर्गातील प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे. काही लोक डोंगरावरती आग लावतात. यामुळे अनेक जीव विषाणू नष्ट होतात. मोर गवतात अंडी घालत असल्यामुळे त्याची प्रजाती नष्ट होण्याची शक्यता आहे. याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे. भारतातील चित्ता हा प्राणी नामशेष होण्याचे कारण वणवा हेच आहे. आपण सर्वांनी वन्यप्राणी व निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. झाडे लावावी निसर्गाचे रक्षण करावे, असे आवाहन केले.

यावेळी एस.व्ही. वजरीणकर, एल.बी. पाटील, डी.एल. कुंभार, पी.एन. खोत, श्रीमती ए.सी. साळुंखे, श्रीमती ए.बी. कदम, एस.एस. खोत, ए.एस. नायकवडी आदी उपस्थित होते.

फोटो-०९०२२०२१-आयएसएलएल-नेर्ले न्यूज

नेर्ले (ता. वाळवा) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात वनवणवा सप्ताह कार्यक्रम झाला. यावेळी अमोल शिंदे, दीपाली सागावकर, छायाताई रोकडे, एस.एन. निकम, एस. व्ही. वजरीणकर, एल.बी. पाटील यांची उपस्थिती होती.

Web Title: It is everyone's duty to conserve the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.