खुंदलापुरचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:48+5:302021-01-13T05:09:48+5:30

शिराळा : खुदलापूरच्या पुनर्वसनात काय त्रुटी आहेत, हे पाहून शंभर टक्के पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत ...

The issue of rehabilitation of Khundalapur will be resolved | खुंदलापुरचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार

खुंदलापुरचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार

शिराळा : खुदलापूरच्या पुनर्वसनात काय त्रुटी आहेत, हे पाहून शंभर टक्के पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहे.

खुदलापूरच्या पुनर्वसनाबाबत माजी आ. शिवाजीराव नाईक व जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर डॉ. चौधरी बोलत होते. ते म्हणाले, शिराळाचे तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडून संबंधित गावांच्या पुनर्वसनाची माहिती घेतली जाईल. या अधिकाऱ्यांबरोबर नागरिकांची बैठक घेऊन पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल. खुंदलापूर ग्रामस्थांनी ज्या गावांमध्ये पुनर्वसनासाठी जागा पाहिली असेल तेथे मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रशासन बांधील आहे. नागरिकांनी त्यांचे प्रश्न आमच्यासमोर मांडावेत.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, तहसीलदार गणेश शिंदे, प्रांताधिकारी नागेश पाटील, मणदूर सरपंच वसंत पाटील, खुंदलापूरचे माजी सरपंच तुकाराम गावडे, भागोजी डोईफोडे, बाबूराव डोईफोडे, विठ्ठल डोईफोडे, धोंडिबा डोईफोडे, टकू डोईफोडे, मारुती गिरीवाले, रामचंद्र जाधव, मोहन पाटील आदींसह या गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ-: जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चांदोली अभयारण्यग्रस्तांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, माजी मंत्री शिवाजीराव नाईक आदी उपस्थित होते.

Web Title: The issue of rehabilitation of Khundalapur will be resolved