अपहाराचा मुद्दा गाजणार
By Admin | Updated: September 23, 2015 00:07 IST2015-09-22T23:03:18+5:302015-09-23T00:07:07+5:30
जिल्हा बँकेची आज सभा : २३ विस्तारित कक्षांचा निर्णय शक्य

अपहाराचा मुद्दा गाजणार
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या पंधरा वर्षात जवळपास दीड कोटी रुपयांची अफरातफर केली असून बँकेच्या मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेत याप्रकरणी जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बड्या तीस थकबाकीदारांवरील कारवाईचा मुद्दाही कळीचा बनणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा बँकेची वार्षिक सभा २३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. सभेच्या विषयपत्रिकेवर अनेक महत्त्वाचे विषय आहेत. यामध्ये शाखानिहाय झालेल्या अफरातफरीची आकडेवारी, तसेच नव्या विस्तारित कक्षांचा विषय महत्त्वाचा आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतरची ही पहिलीच वार्षिक सभा होत आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकेच्या संचालक मंडळाने अनेक निर्णय घेतलेले आहेत. कर्जवाटपाबरोबरच थकित कर्जांच्या वसुलीसाठी पावले उचलली जात आहेत. प्रत्यक्षात अद्याप वसुलीसाठी ठोस कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हा विषय चर्चेला येऊ शकतो. सध्याचा हा ज्वलंत विषय आहे. सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधकांनी १ जानेवारी २0१३ रोजी काढलेल्या एका परिपत्रकानुसार नवीन शाखा, विस्तारित कक्ष सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार २३ नवे विस्तारित कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. व्यवसाय वाढीच्यादृष्टीने संबंधित आर्थिक वर्षात व्यवसाय करावयाच्या नवीन ठिकाणी विस्तारित कक्षांचा तपशील वार्षिक सभेत द्यायचा असतो. त्यानुसार बँकेने २0१६-२0१७ चा व्यवसाय वृद्धिंगत आराखडा तयार केला असून त्यामध्ये एप्रिल २0१६ व ३१ मार्च २0१७ अखेर बँकेची संभाव्य आर्थिक स्थिती कशी राहील, याविषयीचा तपशील देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पंधरा वर्षांतील शाखानिहाय अपहार...
शाखा अपहार दिनांक अपहार रक्कम वसूल थकित
नेलकरंजी२२/२/२00११३,५३,११८८,३२,३१८५,२0,८00
जुनेखेड२१/२/२00६३५00३५00———
अंत्री बुद्रुक्र१६/१0/२00६५५0५५0———
वाळवा २२/२/२00७३,७४,४00३,७४,४00———
उमदी १६/१/२00९४,७६,000४,७६,000———
ऐतवडे खुर्द१४/५/२00९२२,९२,000———२२,९२,000
विश्रामबाग२२/२/२00९३,१२,000३,१२,000———
पेड३0/९/२00९१0,000१0,000———
कर्नाळ ३/६/२0१0२२,00,000२२,00,000———
माडग्याळ १४/६/२0१0१,१0,000१,१0,000———
आमणापूर२८/११/२0१३२0,000२0,0000———
गोटखिंडी१५/२/२0१३१४,३४,५0९१४,३४,५0९———
पुनवत ३/१/२0१३५0,000५0,000———
आवळाई६/९/२0१३१,७३,000१,७३,000———
शिरढोण २८/१0/२0१३७,00,000७,00,000———
मुचंडी २६/५/२0१४१,00,000१,00,000———
तुंग २१/७/२0१४२६,९८,७00६,१0,000२0,८८,७00
चिकुर्डे१४/६/२0१४२२,000२२,000———
घरनिकी१९/११/२0१४११,९0,७३४११,९0,७३४———
मणेराजुरी१५/९/२0१५९,२0,000———९,२0,000
एकूण १,४४,४0,५११८६,१९,0११५८,२१,५00