दिघंचीत गिड्डे वस्ती बंधाऱ्याचा प्रश्न अखेर निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:50+5:302021-01-13T05:10:50+5:30
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील गिड्डे वस्ती बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच अमोल मोरे, सागर ढोले यांच्याकडे शेतकऱ्यांनी ...

दिघंचीत गिड्डे वस्ती बंधाऱ्याचा प्रश्न अखेर निकाली
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील गिड्डे वस्ती बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच अमोल मोरे, सागर ढोले यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली होती.
आमदार अनिल बाबर व तानाजी पाटील यांच्याकडे सरपंच मोरे, सागर ढोले, बाळासाहेब होनराव, मुन्ना तांबोळी यांनी पाठपुरावा केला. आमदार बाबर व पाटील यांनी अनेक वर्षे रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लावला. बंधारा आज पूर्ण क्षमतेने भरला आहे.
गिड्डे वस्ती बंधाऱ्याची गळती थांबल्याने व बंधारा पूर्ण क्षमतेने भरला असल्याने सुमारे १२५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या बंधाऱ्याची पाहणी सरपंच मोरे व ढोले यांनी केली. यावेळी रामभाऊ शिंदे, काकासाहेब मोरे, अतुल मोरे, निवांत चव्हाण, अण्णा मोरे, अजित रणदिवे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : गिड्डे वस्ती बंधाऱ्याची पाहणी करताना सरपंच अमोल मोरे सागर ढोले व अन्य.