शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात कोटीच्या जुन्या नोटा केल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 16:32 IST

अडीच वर्षांपूर्वी चलनातून बाद केलेल्या ५00 व १000 रुपयांच्या एक कोटी रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती इस्लामपूर येथे लागले. जुन्या नोटा देऊन चलनातील नवीन नोटा घेण्यासाठी या नोटांची मोटारसायकलवरून वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. अन्य एक संशयित ताब्यात असून, त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देइस्लामपुरात कोटीच्या जुन्या नोटा केल्या जप्तमोटारसायकलवरून नोटांची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

इस्लामपूर : अडीच वर्षांपूर्वी चलनातून बाद केलेल्या ५00 व १000 रुपयांच्या एक कोटी रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती इस्लामपूर येथे लागले. जुन्या नोटा देऊन चलनातील नवीन नोटा घेण्यासाठी या नोटांची मोटारसायकलवरून वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. अन्य एक संशयित ताब्यात असून, त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दीपक प्रल्हाद बाकले (रा. जुळेवाडी, ता. कऱ्हाड ) व दत्ता हरिसिंग हजारे (वय १९, रा. किल्लेमच्छिंद्रगड, ता. वाळवा) अशी अटकेत असणाऱ्या दोघांची नावे आहेत, तर रमेश मोहनराव पाटील (रा. नरसिंहपूर, ता. वाळवा) हा रुग्णालयात उपचार घेत आहे. या टोळीमध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.दत्ता हजारे ३0 एप्रिल रोजी सायंकाळी अल्पवयीन मुलास सोबत घेऊन, चलनातून बाद करण्यात आलेल्या ५00 व १000 रुपयांच्या नोटा मोटारसायकलवरून घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे, हवालदार गजानन जाधव, एस. एम. पेठकर, एस. आर. जगदाळे, के. एस. पाटील यांच्या पथकाने सापळा रचून नवीन तहसील कचेरीसमोरील हॉटेलसमोर ही कारवाई केली.हजारे मुलासोबत सायंकाळी ५.३0 च्या सुमारास मोटारसायकलवरून (क्र. एमएच १0 डीबी ८१६२) आला. दोघांच्या मध्ये रेक्झीन बॅग, तर मुलाच्या पाठीवर सॅक होती. पोलिसांना त्यांचा संशय आल्यावर झडती घेण्यात आली.

यावेळी रेक्झीन बॅगेत ५२ लाख ५३ हजारांच्या, तर सॅकमध्ये ४७ लाख ४४ हजार ५00 रुपयांच्या चलनातून बाद केलेल्या नोटा मिळून आल्या. दीपक बाकले आणि रमेश पाटील या दोघांकडून ही रक्कम मिळाल्याचे हजारेने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी बाकले व पाटीलला ताब्यात घेतले.केंद्र शासनाने वापरात आणण्यास प्रतिबंधित केलेल्या नोटा बाळगल्याचा आणि शासनाची फसवणूक केल्याचा ठपका या टोळक्यावर ठेवण्यात आला आहे. या रोकडमध्ये ५00 रुपयांच्या १८९ बंडलांचा समावेश आहे, तर एक हजार रुपयांच्या चार बंडलांचा समावेश आहे.

रोकडसह तीन मोबाईल, मोटारसायकल असा १ कोटी २८ हजार ५00 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आशुतोष चव्हाण अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणNote BanनोटाबंदीSangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी