इस्लामपुरात विद्यार्थिनीने स्वतःला जखमी करून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:26 AM2021-03-08T04:26:10+5:302021-03-08T04:26:10+5:30

इस्लामपूर : शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी धमकावणाऱ्या मुलाच्या त्रासाला कंटाळून धारदार ब्लेडने ...

In Islampur, the student injured herself | इस्लामपुरात विद्यार्थिनीने स्वतःला जखमी करून घेतले

इस्लामपुरात विद्यार्थिनीने स्वतःला जखमी करून घेतले

Next

इस्लामपूर : शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी धमकावणाऱ्या मुलाच्या त्रासाला कंटाळून धारदार ब्लेडने डाव्या हाताच्या मनगटावर कापून घेत स्वतःला जखमी करून घेतले. ही घटना रविवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. याप्रकरणी सोलापूर येथील दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत (पूर्ण नाव नाही) आणि त्याचा २१ वर्षांचा मित्र (दोघे रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. रविवारी सकाळी अनिकेतने पीडित मुलीच्या मोबाईलवर संपर्क साधत ‘तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव’ असे म्हणाला. त्याला पीडित मुलीने नकार दिला. त्यावर त्याने हॉस्टेलवर येऊन धिंगाणा घालणार, अशी धमकी दिली. त्याच्या या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुलीने ब्लेडने हातावर कापून घेत स्वतःला जखमी करून घेतले. पोलीस नाईक स्वामी अधिक तपास करत आहेत.

Web Title: In Islampur, the student injured herself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.