इस्लामपूर, शिराळ्यात आज रास्ता रोको करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:25 IST2021-03-26T04:25:32+5:302021-03-26T04:25:32+5:30
इस्लामपूूर : इस्लामपूर व शिराळा येथे आज, शुक्रवारी भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजप ...

इस्लामपूर, शिराळ्यात आज रास्ता रोको करणार
इस्लामपूूर : इस्लामपूर व शिराळा येथे आज, शुक्रवारी भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक यांनी दिली.
ते म्हणाले, घरगुती व कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नये या संदर्भात इस्लामपूर येथील महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात आम्ही निवेदन दिले होते. त्या निवेदनात आम्ही नमूद केले होते की, कोरोनामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. तरी त्याचे आपल्या कार्यालयाकडून वीज कनेक्शन तोडले जाऊ नये तसेच आम्ही विभागातील प्रत्येक कार्यालयालयाकडे कळवले आहे व विनंती केली होती. असे असतानाही राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांमार्फत वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही आज सकाळी ठीक दहा वाजता पेठ-सांगली रस्त्यावर पंचायत समिती इस्लामपूरसमोर व शिराळा येथे लाक्षणिक रास्ता रोको आंदोलन करणार आहोत.
यावेळी इस्लामपूरचे नगरसेवक अमित ओसवाल, नगरसेवक चेतन शिंदे, शिराळ्याचे नगरसेवक केदार नलवडे, पेठचे माजी उपसरपंच शंकर पाटील, भाजप विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रवीण चिकुर्डेकर, इंद्रजित पाटील उपस्थित होते.