इस्लामपूर व्यायाम मंडळ अजिंक्य

By Admin | Updated: December 29, 2014 23:48 IST2014-12-29T23:09:41+5:302014-12-29T23:48:50+5:30

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा: सातारा पोलीस संघ उपविजेता

Islampur Shiksha Mandal Ajinkya | इस्लामपूर व्यायाम मंडळ अजिंक्य

इस्लामपूर व्यायाम मंडळ अजिंक्य

शिरटे : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत इस्लामपूरच्या व्यायाम मंडळाने सातारा पोलीस संघाला पराभूत करत अजिंक्यपद पटकावले.
या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार मानसिंगराव नाईक, डॉ. विश्वास पाटील, सरपंच संजय पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. अंतिम सामन्यात इस्लामपूर व्यायाम मंडळाने सातारा पोलीस संघावर ४ गुणांनी मात करीत अजिंक्यपद पटकावले.
तृतीय क्रमांक कासेगावच्या राजारामबापू क्रीडा मंडळ ‘अ’ ने पटकावला. या स्पर्धेसाठी राज्यातून २४ संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघांना अनुक्रमे ३0 हजार, २0 हजार, १0 हजार रुपये रोख व जयवंतराव भोसले चषक देण्यात आला. पं. स.चे सभापती रवींद्र बर्डे, डॉ. संजय थोरात, डॉ. नितीन जाधव, डॉ. विश्वास पाटील, अ‍ॅड. संग्राम पाटील, सरपंच संजय पाटील, महिपतराव पाटील, सर्जेराव पाटील, शिवाजीराव पाटील आदींच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
भालचंद्र जाधव, तानाजी जाधव, सिद्राम जाधव व देशमुख यांनी पंच म्हणून, तर प्रीतम पाटील, उमेश कुलकर्णी, प्रेमजित पाटील, दिग्विजय पाटील यांनी गुणलेखक व अ‍ॅड. मुरलीधर पाटील, एन. आर. पाटील यांनी समालोचक म्हणून काम पाहिले.
प्रा. ए. बी. पाटील, धनंजय पाटील, विशाल साळुंखे, प्रा. दिग्विजय पाटील, संभाजी पाटील, प्रताप पाटील, हणमंत पाटील, यांनी स्पर्धेचे संयोजन केले. (वार्ताहर)


विशेष पुरस्कार
इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या कृष्णा मदने याची उत्कृष्ट चढाईपटू म्हणून निवड झाली. २ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला.
सातारा पोलीस दलाच्या मारुती लाटणे याला उत्कृष्ट पकडीसाठी २ हजारांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.


येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील प्रथम विजेत्या इस्लामपूर व्यायाम मंडळास सभापती रवींद्र बर्डे यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. संजय थोरात, डॉ. नितीन जाधव, डॉ. विश्वास पाटील, अ‍ॅड. संग्राम पाटील, दिग्विजय पाटील उपस्थित होते.

Web Title: Islampur Shiksha Mandal Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.