इस्लामपूर सखी सदस्यांना टू-व्हीलर जिंकण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:40 IST2020-12-16T04:40:22+5:302020-12-16T04:40:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर आणि परिसरातील ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांना नेहमीप्रमाणे टु-व्हीलर जिंकण्याची संधी मिळणार आहे. कोरोनाच्या ...

Islampur Sakhi members get a chance to win a two-wheeler | इस्लामपूर सखी सदस्यांना टू-व्हीलर जिंकण्याची संधी

इस्लामपूर सखी सदस्यांना टू-व्हीलर जिंकण्याची संधी

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : इस्लामपूर आणि परिसरातील ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांना नेहमीप्रमाणे टु-व्हीलर जिंकण्याची संधी मिळणार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे लकी ड्रॉ कूपनची मुदत ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी सखी सदस्यांनी आपली कुपन्स ज्या ज्या ठिकाणी प्रायोजक आहेत, त्या त्या ठिकाणी जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. सखी मंच २०२० च्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु फेब्रुवारीदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे होणारे सर्व कार्यक्रम ऑनलाईन सुरू होते. त्याला सखी सदस्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कोरोनाच्या कालावधित व्यापारी पेठा बंद होत्या. त्यामुळे लकी ड्रॉचे कूपन सदस्यांना जमा करता आले नाही. आता सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. त्यामुळे इस्लामपूर आणि परिसरातील सखी सदस्यांनी आपली कुपन्स ३१ जानेवारी २०२१ पूर्वी त्या-त्या ठिकाणी जमा करावीत. लकी ड्रॉचे प्रायोजक- वनश्री नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी- इस्लामपूर, सिद्धी बॅग्ज हाऊस-इस्लामपूर, गणेश होम अप्लायन्सेस-इस्लामपूर, मे. राजमाने ब्रदर्स-इस्लामपूर, सुनीता साडी सेंटर अ‍ॅन्ड लेडीज शॉपी-शिराळा, माय चाॅईस ब्युटी स्टोअर्स-इस्लामपूर, तेजस्विनी सारीज्-इस्लामपूर, फिनिक्स एजन्सीज्-इस्लामपूर, साई ज्वेलर्स अ‍ॅन्ड लेडीज डिपार्टमेंट-इस्लामपूर, अ‍ॅड. मनीषा रोटे- इस्लामपूर, जय महाराष्ट्र बझार-इस्लामपूर, वाळवेकर वॉच अ‍ॅन्ड इलेक्ट्रिॉनिक्स-इस्लामपूर, सोनल नॉव्हेल्टीज् कॉस्मेटिक अ‍ॅन्ड इमिटेशन ज्वेलरी-इस्लामपूर, जय कलेक्शन-इस्लामपूर, वाडेकर ज्वेलर्स अ‍ॅन्ड साडी सेंटर-इस्लामपूर, स्वराज्य सेल्स कॉर्पोरेशन-तासगाव, जाधव वॉच अ‍ॅन्ड ऑप्टिकल-इस्लामपूर, कोठारी ज्वेलर्स-इस्लामपूर, एक्सल डर्मा, स्किन, हेअर अ‍ॅन्ड लेजर क्लिनिक-इस्लामपूर, पोरवाल ज्वेलर्स-इस्लामपूर हे लकी ड्राॅ बक्षीस प्रायोजक असून, सखी सदस्यांनी आपली कुपन्स् जमा करावीत, असे आवाहन लोकमत सखी मंच, इस्लामपूरतर्फे केले आहे.

Web Title: Islampur Sakhi members get a chance to win a two-wheeler