शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या उभारीसाठी इस्लामपूरमध्ये खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:23 IST

अशोक पाटील  इस्लामपूर : राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे ...

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या उभारीसाठी इस्लामपूरमध्ये खलबते इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांचे वलय कायम

अशोक पाटील इस्लामपूर : राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे वलय कायम आहे. त्यामागचे गमक जाणून घेण्यासाठी आणि राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आ. पाटील, आ. जितेंद्र आव्हाड यांच्यात गुरुवारी खलबते झाली.लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यासाठी शरद पवार इस्लामपुरात आले होते. राजारामबापूप्रेमींची गर्दीने भरपावसातही सभामंडप खचाखच भरला होता, राष्ट्रवादीच्या पडझडीमध्येही जयंत पाटील यांचे वलय कायम असल्याचे पाहून शरद पवार भावूक झाले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या भावनिक भाषणामुळे सारा सभामंडप स्तब्ध झाला. यावेळी पवार यांचेही डोळे पाणावले. त्यानंतर राष्ट्रवादीला पुन्हा उभारी देता येईल का, याबाबत पवार, आ. पाटील आणि आ. आव्हाड यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही इस्लामपूर मतदारसंघात आ. जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का लागला नाही.

जिल्ह्यात राष्ट्रवादीला ग्रहण लागले. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांमध्येही भाजपने पाय रोवले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला खीळ बसली. लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आ. पाटील यांच्या विरोधकांची मोट बांधण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यश मिळाले. येथून काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांचा पराभव झाला असला तरी, इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातून शेट्टी यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. शेट्टींचा पराभव लक्षात घेता आता आ. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे.आ. जयंत पाटील यांच्याकडे भविष्यात राज्याचे नेतृत्व येईल, असे सूतोवाच राजारामबापूंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात शरद पवार यांनी केले. पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीमधील खासदार, आमदार भाजपकडे वळवण्याचा सपाटा लावला आहे. यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीतील ही गळती थांबविण्याची जबाबदारी आमदार पाटील यांच्यावर आली आहे. ही जबाबदारी ते कितपत पेलतात, हे येत्या दोन महिन्यांत समजणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारSangliसांगली