शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: गृहप्रवेशाच्या खर्चाची रक्कम अंधश्रद्धा निर्मूलनास, महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून गृहप्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 11:59 IST

इस्लामपूर : इस्लामपूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इस्लामपूरचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. शंकर माने यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कलाविष्कार ...

इस्लामपूर : इस्लामपूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इस्लामपूरचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. शंकर माने यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कलाविष्कार या नवीन वास्तूच्या गृहप्रवेशावेळी सत्यनारायण पूजा, होमहवन, शांती अशा सर्व कर्मकांडाला फाटा देत महापुरुषांचे स्मरण आणि त्यांच्या पुतळ्यांचे पूजन करून अनोख्या पद्धतीने गृहप्रवेश केला.या सर्व प्रकारच्या कर्मकांडासाठी खर्च होणारी रक्कम १० हजार रुपये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देणगी स्वरूपात समितीच्या राज्य अध्यक्षा सरोज पाटील (माई) यांच्याकडे सुपुर्द केली. क्रांतिसिंह नाना पाटीलनगरमध्ये माने यांनी आपले घर बांधताना सुरुवातीपासूनच कोणत्याही स्वरूपाचे वास्तुशास्त्र न मानता स्वत:च्या गरजेप्रमाणे घराची रचना केली.संपूर्ण बांधकामावेळीही कोणत्याही पद्धतीचे कर्मकांड केले नाही. त्यांच्या या निर्णयामुळे इंजिनिअरला घराचे बांधकाम करणे खूपच सोपे झाले. विशेष म्हणजे घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणमुखी आहे. घरासाठी कूपनलिका पाडतानासुद्धा त्यांनी कोणत्याही पानाड्याला न बोलावता आपल्या सोयीप्रमाणे उपलब्ध जागेत कूपनलिका पाडली.गृहप्रवेशासाठी कोणताही मुहूर्त न पाहता, होमहवन, सत्यनारायण पूजा न करता पुरोहितांना न बोलाविता विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करून गृहप्रवेश केला.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्षा सरोज पाटील (माई), महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड एन. आर. पाटील, सुनील पाटील, अंनिसचे जिल्हाध्यक्ष व्ही. वाय. पाटील, कार्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव, प्राचार्य विश्वास सायनाकर, राजारामबापू कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील, ॲड. सुभाष पाटील, बी. ए. पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, सरपंच आनंदराव अदाटे, नगरसेवक संग्राम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना महापुरुषांच्या विचारांची पुस्तके आणि प्रतिमा भेट देण्यात आली.

टॅग्स :Sangliसांगली