इस्लामपूर, भिलवडी संघाला विजेतेपद
By Admin | Updated: November 24, 2014 23:05 IST2014-11-24T22:26:56+5:302014-11-24T23:05:26+5:30
व्हॉलिबॉल स्पर्धा : इस्लामपुरात आयोजन

इस्लामपूर, भिलवडी संघाला विजेतेपद
इस्लामपूर : येथील हुतात्मा स्मारकातील इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या मैदानावर झालेल्या व्हॉलिबॉलच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत पुरुष गटातून यजमान इस्लामपूर व्यायाम मंडळाने, तर महिला गटातून भिलवडीच्या सेकंडरी हायस्कूलने विजेतेपदाचा बहुमान पटकावला.
कुरुंदवाड येथे १० ते १४ डिसेंबरअखेर होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलिबॉल स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ निवडण्यासाठी एकदिवसीय स्पर्धा झाली. या स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील व्हॉलिबॉल शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील प्रसिध्द सराफी उद्योजक बाळासाहेब पोरवाल यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
यावेळी संघटनेचे सचिव प्रा. एम. एस. सूर्यवंशी, इस्लामपूर व्यायाम मंडळाचे व्यवस्थापक पोपट पाटील, मानसिंग पाटील, प्रा. एस. ए. जानराव, दिनकर कोळेकर, राजाराम पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरुष गटात जिल्ह्यातील ७, तर महिला गटात ५ संघांनी सहभाग घेतला होता. पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून जयकर पाटील व सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अमोल खोत काम पाहतील. महिला संघासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक प्रकाश पाटील, सहाय्यक प्रशिक्षकपदी एम. टी. देसाई यांची निवड करण्यात आली.
डी. के. किणीकर व राहुल पवार व्यवस्थापक असतील. प्रवीण माने, उदयसिंह पाटील, अमोल खोत, प्रा. संदीप पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)
पुरुषांचा संघ असा
संकेत पाटील, महेश पाटील, आशितोष आडके, सुशांत पाटील, दर्शन पाटील, प्रमोद पाटील, प्रवीण माने, अजित पाटील, संग्राम पाटील, जयदीप साळुंखे, संतोष कुंभार, अतुल बाबर, पुरुषोत्तम पायमल, राहुल गोरे, जीवन पवार, आदर्श इंगवले.
महिला संघ जाहीर
ऋतुजा कदम, कल्याणी भोळे, ऐश्वर्या ऐतवडे, स्वप्नाली मोरे, सुधा मोरे, प्रणोती पाटील, गायत्री मोहिते, किरण माने, भाग्यश्री पाटील, प्रियांका जाधव, पूजा पाटील, प्राजक्ता चौगुले, जस्मीन शेख, समीक्षा किणीकर, रेणुका देसाई, नेहा शिंदे.