शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

इस्लामपूर : अरविंद पवारला कुरळप पोलिसांचे होते अभय! तडजोडीद्वारे गुन्हेगारी वाढली :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:11 IST

कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाताई आश्रमशाळेतील आठ मुलींवरील लैंगिक शोषणाच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला असतानाच, येथील पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या कृष्णकृत्यांबाबत केलेल्या सोयीस्कर दुर्लक्षाच्या कहाण्याही चर्चेत आल्या आहेत.

ठळक मुद्देदडपलेल्या प्रकरणांच्या चौकशीची गरजआश्रमशाळेतील दुष्कृत्ये करताना त्याला कोणाचेही भय वाटले नाही

अशोक पाटील ।इस्लामपूर : कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाताई आश्रमशाळेतील आठ मुलींवरील लैंगिक शोषणाच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला असतानाच, येथील पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या कृष्णकृत्यांबाबत केलेल्या सोयीस्कर दुर्लक्षाच्या कहाण्याही चर्चेत आल्या आहेत. पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या, तर शाळेतील कित्येक मुलींवरील अत्याचाराच्या घटना टळल्या असत्या.

कुरळप पोलीस ठाणे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून १० ते १२ किलोमीटर आतील बाजूस आहे. त्यामुळे या ठाण्याशी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपर्कही कमीच आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया गावांमध्ये घडलेल्या गुन्ह्यांवर तडजोडी करून पांघरुण घातले जाते. त्यामुळे याठिकाणी अवैध धंद्यांचाही सुळसुळाट झाला आहे. अरविंद पवार यानेही यापूर्वी अशीच काळी कृत्ये केली होती. परंतु त्यावरही पोलिसांनी पांघरुण घातले आहे. या प्रकरणात जे जे जबाबदार आहेत, त्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

यापूर्वी अरविंद पवार याने पैशाच्या जोरावर अनेक बेकायदेशीर कामे केली आहेत. संस्थेवरील नियुक्त्यांपासून त्याने बेकायदेशीर कामांना सुरुवात केली. त्याने आपला भाचा सुभाष पाटील याची आश्रमशाळेवर अधीक्षक म्हणून नेमणूक केली, तर पत्नी नंदा पवार हिचेही नाव स्वयंपाकीण म्हणून आश्रमशाळेच्या मस्टरवर घेतले आहे. तिच्याबदली मनीषा कांबळे हिला स्वयंपाकाच्या कामासाठी नेमले होते. तिच्या माध्यमातूनच तो या मुलींवर अत्याचार करीत असल्याचे उजेडात आले आहे. संस्थेतील हा प्रकार पचविल्यानंतर एकामागोमाग एक काळी कृत्ये त्याने पूर्णत्वास नेली.

गणपती विसर्जनावेळी शाळेतील एका विद्यार्थ्याचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला होता. हे प्रकरण त्याने दडपले. एका विद्यार्थ्याने पवार याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शाळेतील बहुतांशी कर्मचाºयांना मांगले येथील त्याच्या शेतात आणि घरात काम करण्यास पवार भाग पाडत होता.शाळेतील शिपाई संदीप सुरेश शिंदे यांना त्याने त्याच्या शेतातील झाड तोडण्यास सांगितले होते. परंतु झाड तोडताना शिंदे हे झाडावरून पडले आणि त्यांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरणही त्याने पचवले होते.तडजोडीची झलक...तडजोडीची झलक आश्रमशाळेतील घटनेनंतरही बुधवारी पोलिसांनी अनुभवली. त्याला ताब्यात घेऊन कुरळपला परतत असताना, ‘काय प्रकरण आहे ते आपसात मिटवूया’ असे म्हणत त्याने पोलिसांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला. यावरून त्याच्या तडजोडीतील सराईतपणाची कल्पना आली. यापूर्वी त्याचा हा ‘फॉर्म्युला’ कायम कामी आल्यामुळे आश्रमशाळेतील दुष्कृत्ये करताना त्याला कोणाचेही भय वाटले नाही.वरिष्ठ अधिकाºयांकडून जनतेच्या अपेक्षाकुरळप पोलिसांच्या या प्रकरणे दडपण्याच्या प्रकारामुळेच अरविंद पवारसारखे मुजोर या भागात वाढत आहेत. वरिष्ठ अधिकाºयांनी कुरळप पोलीस ठाण्याचे स्टिंग आॅपरेशन करून येथील कारभार सुधारावा, अशी माफक अपेक्षा येथील जनतेतून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली