इस्लामपुरात विरोधकांच्या डोळ्यात नेहमी कावीळच!

By Admin | Updated: September 7, 2015 22:54 IST2015-09-07T22:54:47+5:302015-09-07T22:54:47+5:30

खंडेराव जाधव : विकासात अडथळे आणण्याचा धंदा

Islamophobia always in the eyes of the opponents! | इस्लामपुरात विरोधकांच्या डोळ्यात नेहमी कावीळच!

इस्लामपुरात विरोधकांच्या डोळ्यात नेहमी कावीळच!

इस्लामपूर : इस्लामपूर पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय कुंभार आणि काँग्रेसचे वैभव पवार, विजय पवार यांची अवस्था कावीळ झाल्यासारखीच आहे. आम्ही करत असलेल्या विकास कामांना हातभार लावण्यापेक्षा त्यामध्ये अडथळे आणण्याचा उद्योग त्यांच्याकडून केला जात आहे, असा टोला नियोजन समितीचे सभापती खंडेराव जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना मारला.जाधव म्हणाले की, इस्लामपूर शहरातील विकास कामांना गती आली आहे. आमचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास सुरु आहे. केंद्रात, राज्यात विरोधकांची सत्ता आहे. परंतु भाजपच्या झेंडा मिरवणाऱ्या विजय कुंभार यांनी इस्लामपूर शहरातील विकासासाठी काय केले? आम्ही केलेल्या कामांमध्ये खोट काढणे एवढेच त्यांनी केले आहे. त्यात त्यांना काँग्रेसच्या वैभव पवार, विजय पवार यांचीही साथ लाभली आहे.पावसाळ्यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले होते. परंतु ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप वैभव पवार व त्यांचे बंधू विजय पवार यांनी करून कामे बंद पाडली. याला भाजपच्या विजय कुंभार, विक्रम पाटील, नगरसेवक कपिल ओसवाल यांची साथ होती. आमच्यामुळेच शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे झाले, असा दावा विरोधकांनी केला आहे, तर सत्ताधाऱ्यांनी रस्ते चांगल्या दर्जाचे होत असताना विरोधक विनाकारण कामात अडथळा आणत होते. विरोधकांच्या या भूमिकेमुळे शहरातील काही रस्ते निधी असतानाही करता आले नाहीत, असा पलटवार त्यांनी केला. शासकीय जागेवर असलेल्या जुन्या खोक्यांच्या जागी पालिकेने नवीन खोकी देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विजय कुंभार यांनी वाढीव घरपट्टीवरही आवाज उठवला होता. यावर सत्ताधाऱ्यांनी मौन पाळले आहे. (वार्ताहर)

विरोधक बेदखल---पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी विरोधकांची दखल न घेता खोक्यांचे धूमधडाक्यात उद्घाटन करून चपराक दिली आहे. शहरात मोफत वाय-फायची सेवा नुकतीच कार्यरत झाली आहे.

Web Title: Islamophobia always in the eyes of the opponents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.