शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
7
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
8
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
9
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
10
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
11
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
12
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
13
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
14
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
15
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
16
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
17
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
18
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

Sangli Lok Sabha Constituency: विशाल पाटील बंडखोरीच्या तयारीत?; कार्यकर्त्यांना 'मै हू ना'ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 12:11 IST

दोन अर्ज भरणार, कार्यकर्त्यांना 'मै हू ना'ची आठवण

सांगली : महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीनंतरही सांगलीच्या उमेदवारीचा तिढा सुटत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षातील जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. म्हणूनच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील अपक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून असे दोन अर्ज भरणार आहेत. पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक नाही तर बंडखोरी होणार हे निश्चित आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेसह अन्य छोटे-मोठे मित्रपक्ष मिळून महाविकास आघाडी झाली आहे. या आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या उद्धव सेनेकडून सांगली लोकसभेसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यावरून काँग्रेस आणि उद्धव सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम, उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी मुंबई ते दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेऊनही सांगली लोकसभेचा तिढा सुटला नाही. यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, विशाल पाटील यांच्यावर बंड करण्यासाठी दबाव वाढला आहे. यातूनच विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक, नाही तर बंड करण्याची तयारी ठेवली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांना काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज भरण्याची सूचना दिली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला आणि सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली तर उत्तमच आहे. नाही मिळाली तर विशाल पाटील बंडखोरी करणार हे निश्चित झाले आहे, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

कार्यकर्त्यांना 'मै हू ना'ची आठवणमाजीमंत्री स्वर्गीय मदन पाटील यांनी 'मै हू ना' म्हणत २००४ मध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करुन विजय खेचून आणला होता. याप्रमाणेच विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी करावी, आम्ही विजय खेचून आणू, अशी कार्यकर्त्यांनी पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाvishal patilविशाल पाटीलcongressकाँग्रेस