शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शंभूराज देसाई कोयना धरणाचे मालक आहेत का?, खासदार संजय पाटील यांचा सवाल 

By अविनाश कोळी | Updated: November 25, 2023 18:34 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली तक्रार 

सांगली : कोयना धरणातील पाणी अडविणारे साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे मालक लागून गेले का, असा सवाल भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान पाण्याच्या प्रश्नासाठी प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.पाटील म्हणाले की, कोयना धरण शंभूराज यांच्या सात-बाऱ्यावर नोंदलेले नाही. त्यांनी मालकीहक्क गाजवू नये. अशा अडेलतट्टू भूमिकेचा आम्ही निषेध करीत आहोत. कोयना धरणाच्या पाण्यावरुन कधीच असा वाद इतिहासात घडला नाही. देसाईंचा या पाण्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्याची मागणी केली आहे. देसाई यांचे ऐकून पाणी अडविणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही राहू.सांगली जिल्ह्यातील जनतेने मला खासदार बनविले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नासाठी खासदारकी पणाला लावू. सांगली जिल्ह्याच्या वाट्याला एकूण ३२ टीएमसी पाणी आहे. पुढील जून महिन्यापर्यंत टप्प्याटप्प्याने पाणी सोडणे अधिकाऱ्यांना क्रमप्राप्त आहे. त्यामुळे अशी आडकाठी यापुढे आम्ही चालू देणार नाही. पालकमंत्र्यांना पाणी अडविण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी अशी कृती केल्यास योग्य त्या पद्धतीने उत्तर देऊ, असा इशारा पाटील यांनी दिला.

अमित शहांकडे तक्रारपाटील म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांच्याकडे देसाई यांच्याबाबत तक्रार केली आहे. तक्रारीनुसार त्यांना ताकीद दिली नाही, तर खासदारकीचा राजीनामा देऊ. टोकाची भूमिका घेण्याचीही माझी तयारी आहे. देसाई यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घेण्याची मागणीही केली आहे.

बाबर यांच्यावरही टीकाआमदार अनिल बाबर यांनी पाणी सोडण्याची मागणी करण्याची मुख्यमंत्री वाट पहात होते का, असा सवाल पाटील यांनी केला. सांगलीला पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पाण्याचे दान दिलेले नाही. हक्काच्या पाण्यासाठी अशा आदेशाची गरजच काय, असा सवालही पाटील यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणShambhuraj Desaiशंभूराज देसाई