साळमळगेवाडी खूनप्रकरणी तपास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:27 IST2021-01-25T04:27:02+5:302021-01-25T04:27:02+5:30

जत : साळमळगेवाडी (ता. जत) येथील दूध व्यावसायिक अजित बाबासाहेब खांडेकर (वय २१) याच्या खूनप्रकरणी संशयित आरोपींना अटक करण्यात ...

Investigation into Salmalgewadi murder case continues | साळमळगेवाडी खूनप्रकरणी तपास सुरूच

साळमळगेवाडी खूनप्रकरणी तपास सुरूच

जत : साळमळगेवाडी (ता. जत) येथील दूध व्यावसायिक अजित बाबासाहेब खांडेकर (वय २१) याच्या खूनप्रकरणी संशयित आरोपींना अटक करण्यात जत पोलिसांना अद्याप यश आले नाही.

अजित खांडेकर याचा गुरुवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी धारदार हत्याराने गळा चिरून निर्घृणपणे खून केला होता. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा जत पोलिसात त्याचा भाऊ राजू खांडेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. मोबाइल कॉल डिटेल्सवरून या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मयत अजित खांडेकर याचा खून होण्यापूर्वी त्याच्या मोबाइलवर कोणाकोणाचे फोन आले होते किंवा त्यांनी कोणाला फोन केले आहेत, याची माहिती घेऊन जत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. खून प्रकरणातील संशयित हल्लेखोरांना अटक करण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली असून ती वेगवेगळ्या भागात पाठविण्यात आली आहेत.

दरम्यान, या परिसरातील चार ते पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे जाबजबाब घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु तपासाची निश्चित दिशा किंवा अधिकृत माहिती त्यांच्याकडून मिळू शकली नाही असे समजते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उत्तम जाधव करत आहेत.

Web Title: Investigation into Salmalgewadi murder case continues