रेमडेसिविर काळाबाजाराची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:02+5:302021-04-27T04:28:02+5:30

ओळी : मिरज सिव्हीलमधील औषधांच्या काळ्या बाजाराबाबत मनसेच्यावतीने अधिष्ठाता डाॅ. सुधीर नणंदकर यांना निवेदन देण्यात आले. लोकमत न्यूज ...

Investigate the Remedicivir black market | रेमडेसिविर काळाबाजाराची चौकशी करा

रेमडेसिविर काळाबाजाराची चौकशी करा

ओळी : मिरज सिव्हीलमधील औषधांच्या काळ्या बाजाराबाबत मनसेच्यावतीने अधिष्ठाता डाॅ. सुधीर नणंदकर यांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मिरज शासकीय रुग्णालयातून रेमडेसिविरची चोरी करून ते काळाबाजारात विकल्याचे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची रुग्णालय प्रशासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केली. याबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. सुधीर नणंदकर यांना निवेदन देण्यात आले.

सावंत म्हणाले की, कोरोनाच्या काळात रुग्णांना रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. अशावेळी रुग्णालयातील रेमडेसिविर बाहेर विकण्याचा प्रकार निंदनीय आहे. या काळा बाजारात रुग्णालयातील केवळ एकाच कर्मचाऱ्याचा सहभाग असू शकत नाही. ही मोठी साखळी असावी. औषध भांडाराचे काम पाहणारे कर्मचारी नेमके काय करीत होते? असा प्रश्नही निर्माण होतो. त्याने किती रुग्णालयांना औषधे पुरविले हे समोर येण्याची आवश्यकता आहे.

आतापर्यंत शासनकडून गोरगरिबांच्या उपचारांसाठी मिळणाऱ्या औषधांचाही काळाबाजार झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा मनसेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

Web Title: Investigate the Remedicivir black market