शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

'रघुनाथदादांसह शेट्टी, खोत यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 13:21 IST

जन आक्रोश यात्रा साखर कारखानदारांची बटीक

इस्लामपूर : स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांची जन आक्रोश यात्रा साखर कारखानदारांची बटीक बनली असून, ती मलिदा गोळा करण्यासाठी निघाली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसाठी किती आंदोलने केली हे सांगावे. त्यामुळे शासनाने रघुनाथदादा पाटील यांच्यासह शेट्टी आणि खोत यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी खळबळजनक मागणी रघुनाथदादा प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी केली.इस्लामपूर येथे पत्रकार बैठकीत पाटील म्हणाले, शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी आपली मालमत्ता विकून संघटना चालवली. त्यांच्याच मार्गाने रघुनाथदादा पाटील हे संघटना चालवत आहेत. मात्र जोशींपासून वेगळ्या झालेल्या शेट्टी व खोत यांनी संघटना चालवताना स्वत:ची मालमत्ता वाढवली आहे. त्याची चौकशी करावी.पाटील म्हणाले, गेल्या हंगामात गळीत झालेल्या उसाला दिवाळीपूर्वी १ हजार रूपये द्या. चालू हंगामात येणाऱ्या उसाला ५ हजार रुपयांचा दर द्या. दोन साखर कारखाने आणि इथेनॉल प्रकल्पामधील अंतराची अट काढून टाका. म्हैस दुधाला पेट्रोलचा तर गायीच्या दुधाला डिझेलचा भाव द्या.ते म्हणाले, या मागण्या मान्य न झाल्यास रघुनाथदादा प्रणीत शेतकरी संघटनेकडून साखर, इथेनॉल, स्पिरिट, मोलॅसिससह भाजीपाला आणि दुधाची वाहतूक रोखून धरणार आहोत.

या वेळी जिल्हा सरचिटणीस धनपाल माळी, माणिकराव पाटील, लक्ष्मण पाटील, केतन जाधव, सयाजी पाटील, महादेव पवार, विकास चिंचोलकर उपस्थित होते.

शेट्टींचे कारखानदारांशी संगनमतराजू शेट्टी हे नेहमीच आॅक्टोबरमध्ये ऊस परिषद घेत होते. मात्र या वेळी त्यांनी कारखानदारांशी संगनमत करत हंगाम उशिरा सुरू करण्यासाठी आक्रोश यात्रा काढत त्यांना मदतच केली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांची संघटना कारखानदारांनी पोसलेली आणि पाळलेली आहे, असा आरोप हणमंतराव पाटील यांनी केला.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय