आंतरराज्य गुन्हेगारास अटक

By Admin | Updated: September 18, 2014 23:24 IST2014-09-18T22:47:08+5:302014-09-18T23:24:33+5:30

बेळगावमध्ये पकडले : घरफोडीचे ४५ गुन्हे दाखल

Interstate crime arrests | आंतरराज्य गुन्हेगारास अटक

आंतरराज्य गुन्हेगारास अटक

सांगली : घरफोडीच्या गुन्ह्यात गेल्या नऊ वर्षांपासून सांगली पोलिसांना हवा असलेला सलीम कमुरुद्दीन सौदागर (वय ४४, रा. बागवानगल्ली, खडेबाजार, बेळगाव) यास गुंडाविरोधी पथकाने आज (गुरुवार) बेळगावमध्ये अटक केली. त्याच्याविरुद्ध घरफोडीचे सुमारे ४५, तर गांजा बाळगल्याप्रकरणी नऊ गुन्हे दाखल आहेत. सांगली शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा ते बारा घरफोड्या त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सलीम सौदागर व त्याचा साथीदार जब्बार गौस सय्यद (ता. हनुमान चौक, सांगली) या दोघांनी २००५ मध्ये विश्रामबाग हद्दीत घरफोडीचे चार गुन्हे केले होते. या गुन्ह्यांत जब्बारला यापूर्वी अटक झाली होती. मात्र सौदागर पोलिसांना चकवा देत फरारी होता. मध्यंतरीच्या काळात त्याचा शोध घेण्याची मोहीम थंडावली होती. दोन दिवसांपूर्वी तो बेळगावमध्ये आश्रयाला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील, हेड कॉन्स्टेबल सुनील भिसे, महेश आवळे, श्रीपती देशपांडे, पप्पू सुर्वे, गुंड्या खराडे, वैभव पाटील, संतोष पुजारी, सागर लवटे, वैशाली माने यांचे पथक बेळगावला रवाना झाले होते. (प्रतिनिधी)

शिक्षा लागूनही...सौदागर हा बेळगाव पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तेथील खडेबाजार, मार्केट, महांतेशनगर या पोलीस ठाण्यात त्याच्यावर घरफोडीचे ४५ गुन्हे दाखल आहेत. अंमली पदार्थ (गांजा) बाळगल्याचेही गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यात त्याला शिक्षाही झाली होती.

Web Title: Interstate crime arrests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.