शेतकऱ्यांना व्याजमाफीचे गाजर

By Admin | Updated: January 4, 2017 23:09 IST2017-01-04T23:09:13+5:302017-01-04T23:09:13+5:30

जयंत पाटील : गौंडवाडी येथे विविध विकास कामांचा प्रारंभ

Interest on Carrots to Farmers | शेतकऱ्यांना व्याजमाफीचे गाजर

शेतकऱ्यांना व्याजमाफीचे गाजर

इस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतरच्या पन्नासाव्या दिवशी केलेल्या भाषणात देशातील जनतेला काळ्या धनाचा हिशेब द्यायला हवा होता़ मात्र त्यांनी त्याबद्दल ब्र शब्दही काढला नाही. उलट नोटाबंदीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी त्यांनी दोन महिन्यांच्या व्याजमाफीचे गाजर दाखविले आहे, असे मत माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
आम्हाला कोणाचा पराभव करायचा नसून, गेल्या २५-३0 वर्षात केलेला विकास रथ पुढे घेऊन जायचा आहे, अशा शब्दात त्यांनी निवडणुकीमागील भूमिकाही स्पष्ट केली.
गौंडवाडी (ता़ वाळवा) येथे ९0 लाख रूपये खर्चाच्या पिण्याच्या पाण्याची योजना व १0 लाख रुपये खर्चून बांधलेल्या नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन आ़ पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संजय पाटील, महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्षा सौ़ सुस्मिता जाधव उपस्थित होत्या़ राजू मुल्ला, सचिन मोहिते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
आ़ पाटील म्हणाले, बोरगाव जि़ प़ मतदारसंघामध्ये सर्वांच्या मान्यतेने उमेदवार निश्चित करू़ मात्र एकदा उमेदवार निश्चित झाला की, सर्व राग-लोभ, गट-तट बाजूला ठेवून त्याच्या पाठीशी उभे राहा़ ज्याप्रमाणे मला विधानसभेला मतदान करता, त्याप्रमाणे या निवडणुकांमध्येही मतदान व्हायला हवे़
सभापती रवींद्र बर्डे, विनायकराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. विश्वास चव्हाण, बाबासाहेब चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीवरील पत्रा काढून टुमदार इमारत दिली, तसेच गावाला शुध्द व मुबलक पिण्याच्या पाण्याची योजना दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नितीन चव्हाण, महेश जाधव, सुरेश हुडे यांनी मनोगत व्यक्त के ले.
याप्रसंगी सुभाषराव पाटील, नंदकुमार पाटील, कार्तिक पाटील, माणिक पाटील, उदय शिंदे, दत्ता खोत, धनाजी पाटील, आनंदराव लकेसर, वसंत कदम, काकासाहेब यादव, शंकर यादव, जयकर साटपे, प्रशांत कदम, विनायक यादव, सुरेखा चव्हाण, पूनम निकम, पुष्पा कुंभार, अनिल चव्हाण, तुषार चव्हाण, बापूसाहेब चव्हाण, ज्योती चव्हाण उपस्थित होते़ अनिल चव्हाण यांनी आभार मानले, शंकर कदम-ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
चर्चा : मतदारांशी
मतदारांशी चर्चा करूनच येथील उमेदवार निश्चित करणार आहे. यामुळे सामान्य कार्यकर्त्यापासून पदाधिकाऱ्यापर्यंत सर्वांनी यासाठी प्रयत्न करा. सर्वांंच्या इच्छेनुसार उमेदवार ठरणार असल्याने गट-तट विसरून प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले. रवींद्र बर्डे, विनायकराव पाटील यांनी पिण्याच्या पाण्याची योजना दिल्याबद्दलही या कार्यक्रमामध्ये कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Interest on Carrots to Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.