विमा कंपनीस ५० लाखांना गंडा घालण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: June 4, 2015 00:01 IST2015-06-03T22:56:02+5:302015-06-04T00:01:19+5:30
तीन डॉक्टरांसह सहाजणांवर गुन्हा

विमा कंपनीस ५० लाखांना गंडा घालण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : मृत व्यक्तीच्या नावे विमा पॉलिसी काढून खासगी विमा कंपनीची सुमारे ५० लाख रुपयांना फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहाजणांवर लक्ष्मीपुरी पोलिसांत बुधवारी गुन्हा दाखल झाला.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तीन डॉक्टरांचा समावेश आहे. सचिन बाबूजी मछले (रा. ई वॉर्ड, एस. एस. सी. बोर्ड, मोतीनगर, कांजरभाट वसाहत, कोल्हापूर), डॉ. वर्षा व्ही. बारगे (रा. विश्वेश्वरी क्लिनिक, करवीर), बिनाबाई सुनील भट (रा. तोरणानगर, शहापूर, इचलकरंजी), डॉ. श्रीराम सावंत (रा. राजेश्वरीनगर, इचलकरंजी), कल्पना शिवाजी सोनुले (रा. महात्मा फुले मातंग वसाहत, कागल, जि. कोल्हापूर), डॉ. सागर पाटील (रा. साके, ता. कागल) अशा सहा संशयितांवर गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद विमा कंपनीसाठी तपास करणाऱ्या पुणे येथील डी. एस. आर. इन्व्हेस्टिगेशन कंपनीचे खासगी तपास अधिकारी सतीश दामोदर नारे (वय ३६, रा. कृषिनगर, पोतदार शाळेजवळ, जि. अकोला) यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की,सुनील फोनसिंग भट (३४, रा. तोरणानगर, शहापूर, इचलकरंजी) हे मृत असून त्यांचे वारस बिनाबाई सुनील भट हे आहेत. सुनील भट हे ११ एप्रिल २०१३ ला मृत झाले असताना त्याऐवजी डॉ. श्रीराम सावंत याने २१ सप्टेंबर २०१४ रोजी सुनील भट हे मृत झाल्याचा मृत्यूचा दाखला दिला. तिसऱ्या प्रकरणात संदीप शिवाजी सोनुले (२४, रा. महात्मा फुले मातंग वसाहत, कागल) यांची बहीण कल्पना शिवाजी सोनुले या एका पॉलिसीला वारस आहेत. संदीप सोनुले हे १२ फेबु्रवारी २०१४ रोजी मृत असताना साकेतील मंगल आनंद क्लिनिकचा डॉ. सागर पाटील याने १ जानेवारी २०१५ रोजी संदीप सोनुले यांचा मृत्यू दाखला दिला आहे. तपास कंपनीने या तिघांच्या पॉलिसी तपासल्या असता सतीश नारे यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर नारे यांनी बुधवारी या सहाजणांविरोधात फिर्याद दिली. या सर्वांनी संगनमतने कंपनीची सुमारे ५० लाखांंची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)