संजयनगर, अभयनगरला अपुरा पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:51+5:302021-03-13T04:48:51+5:30

संजयनगर : सांगली शहरातील अभयनगर, संजयनगर, उत्कर्ष हडको कॉलनी, रुक्मिणी हौसिंग सोसायटीत गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा आणि ...

Insufficient water supply to Sanjaynagar, Abhaynagar | संजयनगर, अभयनगरला अपुरा पाणी पुरवठा

संजयनगर, अभयनगरला अपुरा पाणी पुरवठा

संजयनगर : सांगली शहरातील अभयनगर, संजयनगर, उत्कर्ष हडको कॉलनी, रुक्मिणी हौसिंग सोसायटीत गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. महिलांसह नागरिकांमधून महापालिकेविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

सांगलीच्या संजयनगर, अभयनगर परिसरामध्ये आठ दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. दिवसभर पाणी या ठिकाणी येत नाही, रात्रीचे पाणी असते. तेही कमी दाबाने पाणी मिळत आहे. महिला आणि नागरिकांना रात्रभर जागून पाणी भरावे लागते. नागरिकांनी महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

चौकट

वेळेत बिल भरूनही पाणी नाही

आम्ही पाण्याची बिले वेळेत भरतो, पण पाणी आम्हाला वेळेवर मिळत नाही, असा नागरिकांनी आरोप केला आहे. पूर्वी चोवीस तास पाणी पुरवठा संजयनगर, अभयनगर या ठिकाणी होत होता. सध्या या ठिकाणी पाण्याची टाकी झालेली आहे, तरी देखील अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Web Title: Insufficient water supply to Sanjaynagar, Abhaynagar