जत तालुक्यात बेडची संख्या अपुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:54+5:302021-05-19T04:26:54+5:30
संख : जत तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयात डेडिकेटेड ६४ बेड आहेत. कोविड सेंटर ...

जत तालुक्यात बेडची संख्या अपुरी
संख : जत तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयात डेडिकेटेड ६४ बेड आहेत. कोविड सेंटर बेडची संख्या तोकडी पडत आहे. रुग्णांना मिरज, सांगली, जयसिंगपूर, कोल्हापूर, विजापूरला जावे लागत आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक यंत्रणा अपुरी पडत आहे. गावातील कुटुंब सर्वेक्षण वेळेवर होत नाही. चाचण्यांची किट अपुरी पडत आहेत. रुग्णांची चाचणी वेळेवर होत नाही, तसेच संशयित रुग्णांची तपासणी वेळेवर होत नाही. तेच रुग्ण कोरोनाचे सुपर स्प्रेडर बनत आहेत
कोरोना रुग्णावर उपचारासाठी जत ग्रामीण, माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू आहे. जत ग्रामीण रुग्णालयात २८ बेड, माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात ३६ बेड आहेत. खासगी रुग्णालयांत ११० बेड आहेत. समाजकल्याण वसतिगृहात नाॅनकोविड सेंटर सुरू आहे. विक्रम फाउंडेशनचे डफळापूर, उमदी येथे ८० बेडचे कोविड सेंटर आहेत. डफळापूर येथे ४० बेड व उमदी येथे ४० बेड आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने ती तोकडी पडत आहेत. गरीब रुग्णांना शासकीय रुग्णालयातील बेडसाठी मिरज, सांगली, कोल्हापूर, विजापूर येथे जावे लागत आहे. तेथे दोन, तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
रुग्णसंख्या आठ दिवसांत कमी होईल, असे तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर म्हणाले.
खासगी रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी २५ हजाराची अनामत भरावी लागते. जादा बिलाची आकारणी केली जात आहे.
चौकट
७० बेडचे शासकीय कोविड सेंटर
समाजकल्याण वसतिगृहात दोन दिवसांत ७० डेडिकेटेड बेडचे कोविड सेंटर सुरू होणार आहे. १०० बेडचे नियोजन करून ठेवले आहे. लसीकरण १९ तारखेनंतर वेगाने सुरू होईल. अंगावर दुखणे न काढता लवकर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आ. विक्रम सावंत यांनी केले आहे.
चौकट
जत तालुका दृष्टिक्षेप
-एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या : ७,७१३
-एकूण मृत संख्या : १५७
-एकूण बरे होऊन आलेली रुग्णसंख्या : ५,४८६
-एकूण उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या : २,०७०
-कोरोनामुक्त टक्केवारी : ७१ टक्के