शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: गोटखिंडीत मशिदीमध्ये गणराय थाटात विराजमान, ४४ वर्षांचे ऐक्याचे सुवर्णपान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 19:23 IST

हिंदू-मुस्लीम बांधव साजरे करतात सर्व सणवार 

प्रतापसिंह मानेगोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) गावात धर्मभेदांची दरी नाही, जाती-पाताींच्या भिंती नाहीत... अशी सुसंवादाचे वारे वाहणारे सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी गाव, गेली ४४ वर्षे एक अनोखी परंपरा जोपासत आहे. गावातील ऐतिहासिक मशिदीत दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो आणि ही प्रथा आज हिंदू-मुस्लीम ऐक्याचे तेजस्वी प्रतीक ठरली आहे.सन १९८१ मध्ये मुसळधार पावसामुळे गणपती प्रतिष्ठापनेसाठी निवारा न मिळाल्याने, गावातील हिंदू व मुस्लीम बांधवांनी मशिदीत पहिल्यांदाच श्री गणेशाची प्रतिमा विराजमान केली. त्या दिवशी पेरलेले सामंजस्याचे बीज आज एक भव्य वटवृक्ष बनले आहे. मिरवणुका, आरत्या, भजन-कीर्तन, रक्तदान शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या गावाने महाराष्ट्रास एकात्मतेचा आदर्श घालून दिला आहे."गणपती बाप्पांच्या आगमनाने गावात केवळ धार्मिक वातावरण नव्हे, तर आनंद आणि आपुलकीचा नवा सण दरवर्षी उजाडतो," असे ज्येष्ठ नागरिक सांगतात. तर, मुस्लीम बांधवांचे म्हणणे आहे, "गणेशोत्सव आमच्यासाठीही घरचा सणच आहे. आयोजनात आम्हीही तितक्याच उत्साहाने सहभागी होतो." गोटखिंडीतील सामंजस्यपूर्ण सण साजरेपणाने ४४ वर्षांत एकदाही कुठलाही वाद निर्माण झालेला नाही. उलट येथे हिंदू-मुस्लीम बांधवांच्या घराघरांत एकमेकांचे सण तितक्याच श्रद्धेने साजरे केले जातात.

झुंझार चौकातील मशिदीत गणपती स्थापनेची परंपरा आमच्या गावासाठी अभिमानाची बाब आहे. हिंदू-मुस्लीम बंधुत्वाचे हे बीज आज एकतेच्या विशाल वटवृक्षात परावर्तित झाले आहे. गावातील प्रत्येक सण हा सर्वांसाठी असतो, हेच गोटखिंडीचे वैशिष्ट्य आहे. - दीपाली पाटील, सरपंच, गोटखिंडी