रुग्णसेवेसाठी काम करणाऱ्या परिचारिकांचे कार्य प्रेरणादायी : समीर गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST2021-05-13T04:27:11+5:302021-05-13T04:27:11+5:30

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आष्टा ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकांचा गौरव करताना जायन्टस्‌चे अध्यक्ष समीर गायकवाड, डॉ. संतोष निगडी, डॉ. सतीश बापट, ...

Inspiring work of nurses working for patient care: Sameer Gaikwad | रुग्णसेवेसाठी काम करणाऱ्या परिचारिकांचे कार्य प्रेरणादायी : समीर गायकवाड

रुग्णसेवेसाठी काम करणाऱ्या परिचारिकांचे कार्य प्रेरणादायी : समीर गायकवाड

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आष्टा ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकांचा गौरव करताना जायन्टस्‌चे अध्यक्ष समीर गायकवाड, डॉ. संतोष निगडी, डॉ. सतीश बापट, डॉ. संजय पाटील, डॉ. अविनाश पाटील, सुनील माने, अनिल निर्मळे, सुलताना जमादार.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : कोरोना महामारीमध्ये परिचारिकांमुळे रुग्णांना लढण्याचे बळ मिळत आहे. कोरोनाशी समर्थपणे लढणाऱ्या या रणरागिणी कुटुंब सांभाळत रुग्णसेवेला प्राधान्य देत आहेत, अशा रुग्णसेवेसाठी याेगदान देणाऱ्या परिचारिकांचे काम सर्वांना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जायंटस्‌ ग्रुपचे अध्यक्ष समीर गायकवाड यांनी केले.

जागतिक परिचारिका दिनानिमित्त आष्टा ग्रामीण रुग्णालयातील व कोविड सेंटरमधील परिचारिकांचा गौरव करण्यात आला. यावेळी गायकवाड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष निगडी होते. जायंटस्‌ ग्रुपचे डॉ. सतीश बापट, डॉ. अनिल निर्मळे, कृषिभूषण सुनील माने, आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अविनाश पाटील, डॉ. संजय पाटील उपस्थित होते. परिचारिका सुलताना जमादार यांच्यासह लक्ष्मी गायकवाड, वैष्णवी यादव, कांचन येडगे, स्नेहल मंडले, अश्विनी आवळे, मनीषा माने, सुजाता घोरपडे, प्रकाशनी कांबळे, जयश्री मोहिते, सुषमा कांबळे यांच्यासह सर्व परिचारिकांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. संतोष निगडी म्हणाले, आष्टा ग्रामीण रुग्णालयातील विविध उपक्रमांना जायन्टस्‌ने वेळोवेळी सहकार्य केले आहे. सुलताना जमादार म्हणाल्या, आष्टा गावामधील जायंटस्‌ ग्रुपसह सर्व सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे व आधारामुळे आम्हा सर्वांना काम करण्यासाठी प्रोत्साहन व बळ मिळाले आहे. सागर ढोले, महेश कोरे, ज्ञानेश्वर नरळे, गणेश चोरमुले यांनी नियोजन केले.

Web Title: Inspiring work of nurses working for patient care: Sameer Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.