सेवासदनच्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST2021-04-23T04:28:59+5:302021-04-23T04:28:59+5:30

गतवर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीस शासकीय यंत्रणा एकाकी तोंड देत असताना पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी अभिजित ...

Inspection of Seva Sadan Oxygen Plant | सेवासदनच्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी

सेवासदनच्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी

गतवर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीस शासकीय यंत्रणा एकाकी तोंड देत असताना पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी व आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेप्रमाणे डाॅ. रविकांत पाटील यांनी केवळ बारा दिवसानत वातानुकूलित ऑक्सिजन सप्लाय व व्हेंटिलेटर सुविधा असलेल्या कोविड हाॅस्पिटलची उभारणी केली. गतवर्षी २ ऑगस्ट रोजी कार्यान्वित झालेल्या कोविड हाॅस्पिटलमधे उपचार घेऊन आजपर्यंत बाराशेपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना फुफ्फुसावर हल्ला करत असल्याने शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होते व रुग्णांना बाहेरुन ऑक्सिजन द्यावे लागते. यावर्षी दुसऱ्या लाटेत सर्वच राज्यांत ऑक्सिजनच्या टंचाईमुळे हाहाकार उडाला असताना डाॅ. रविकांत पाटील यांनी पुढील धोका आधीच ओळखून स्वतःची ऑक्सिजन बनवायची यंत्रणा गेल्यावर्षीच बसवून उपचाराखाली असलेल्या रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध केला आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून दररोज सुमारे ८० जंबो सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होते.

जिल्हाधिकारी अभिजित चौधरी व आयुक्त नितीन कापडणीस यांनी ऑक्सिजन प्लांटला भेट देऊन सेवासदन हाॅस्पिटलच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. त्यामुळेच ऑक्सिजनबाबतीत स्वयंपूर्ण सेवासदन कोविड रुग्णांसाठी मोठा आधार ठरला आहे.

Web Title: Inspection of Seva Sadan Oxygen Plant