आशा झिमूर यांच्याकडून शिरसीत विकास कामांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:32 IST2021-01-16T04:32:00+5:302021-01-16T04:32:00+5:30

शिराळा : जिल्हा परिषद सदस्या आशा झिमूर यांनी शिरशीसह वाकुर्डे बुद्रूक जिल्हा परिषद मतदारसंघातील विकासकामांची पाहणी केली. शिरसी ...

Inspection of development works in Shirsit by Asha Zimur | आशा झिमूर यांच्याकडून शिरसीत विकास कामांची पाहणी

आशा झिमूर यांच्याकडून शिरसीत विकास कामांची पाहणी

शिराळा

: जिल्हा परिषद सदस्या आशा झिमूर यांनी शिरशीसह वाकुर्डे बुद्रूक जिल्हा परिषद मतदारसंघातील विकासकामांची पाहणी केली.

शिरसी येथील शाळा इमारत बांधकाम, महिंदवाडी येथील खराब रस्त्याची पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. शिरसी येथील नवीन शाळा इमारत बांधकाम पाहणीबरोबरच जुन्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मिळण्यासाठी शिक्षण सभापती यांच्याकडे मागणी केल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे इमारत अंगणवाडीसाठी निधीची मागणी केल्याचेही झिमुर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, मतदारसंघातील विकासकामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या सहकार्यातून मतदारसंघात अधिकाधिक विकासकामे करता आली.

यावेळी शिरसीचे सरपंच एम. बी. भोसले, विजयराव झिमूर, संदीप महिंद, अरविंद महिंद, रोहित झिमूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Inspection of development works in Shirsit by Asha Zimur