शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आग्रही, पण.. - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

By संतोष भिसे | Updated: January 5, 2024 15:46 IST

..त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही राहणार

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण राज्यात आंदोलने झाली. मनोज जरांगे पाटीलही सभा घेत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच प्रामाणिक इच्छा असून, त्यादृष्टीने राज्य सरकार पावलेही उचलत आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. गरीब मराठा समाजही आरक्षणामुळे मुख्य प्रवाहात येऊ शकतो त्यामुळे या आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही राहणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना केले.आठवले म्हणाले की, मराठा समाजातील गरीब घटकाला आरक्षण मिळायलाच हवे. ज्यांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा घटकाचा यासाठी विचार व्हावा. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. सरकार त्यावर सध्या कामही करत आहे. हे आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. सर्व मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून न घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण दिल्यासही तोडगा मिळू शकतो.सध्या सुरू असलेला ओबीस-मराठा वादही मिटणे आवश्यक आहे. याशिवाय मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातीलही मतभेद मिटवले, तर आरक्षणाच्या मागणीवर सरकारला काम करता येणार आहे. २० जानेवारीपासून जरांगे पाटील मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत. मात्र, ती वेळ येणार नाही त्या अगोदरच शासन यावर निर्णय घेईल. मराठा समाजातील गरिबांना आरक्षणासाठी स्वतंत्र १५ टक्क्यांचे आरक्षण देण्याबाबतही विचार करण्यात येईल.केंद्र स्तरावर क्षत्रिय समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मराठा समाजासह जाट, राजपूत, रेड्डी समाज त्यासाठी आग्रही आहे. दोन ते तीन विभागांत आरक्षणाच्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी विभाग प्रयत्न करत असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणRamdas Athawaleरामदास आठवले