शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्याचा तलाठी लाच घेताना जाळ्यात, रंगेहात पकडले : पाच हजार रुपये घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 13:39 IST

शिराळा येथील तलाठी सुभाष श्रीपती पाटील (वय ५१, रा. ऐतवडे खु., ता. वाळवा) यास ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचून रंगेहात पकडले. याबाबत शिराळा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून संशयित सुभाष पाटील यास अटक केली आहे.

ठळक मुद्देशिराळा पोलिसात गुन्हा नोंद , संशयित सुभाष पाटील यास अटक कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचला सापळा

शिराळा : येथील तलाठी सुभाष श्रीपती पाटील (वय ५१, रा. ऐतवडे खु., ता. वाळवा) यास ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचून रंगेहात पकडले. याबाबत शिराळा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून संशयित सुभाष पाटील यास अटक केली आहे.शिराळा येथील तक्रारदाराने जागा खरेदी केली होती. खरेदी क्षेत्राची नोंद सात-बारावर करण्यासाठी तलाठी पाटील याने सहा हजार रुपये लाच मागितली. तडजोड होऊन पाच हजार रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदाराने कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. गुरुवारी सायंकाळी कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना पाटील याला पकडले.ही कारवाई पोलिस उपायुक्त संदीप दिवाण, पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक पोलिस फौजदार शामसुंदर बुचडे, शरद पोरे, संदीप पालेकर, आबासाहेब गुंडणके, सर्जेराव पाटील यांनी केली.वर्षात तिसरी कारवाई१८ एप्रिल २०१७ रोजी तलाठी संजय पाटील व मंडल अधिकारी सुरेश पाटील यांना, तर १८ जुलै २०१७ रोजी मंडल अधिकारी समीर पटेल यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. गुरुवारी तलाठी सुभाष श्रीपती पाटीलला पकडण्यात आले. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवरील वर्षातील ही तिसरी कारवाई झाली. त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस