एसटीत विनातिकीट प्रवास, जागेवरच दुप्पट दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:46+5:302021-09-26T04:28:46+5:30
सांगली : एसटी महामंडळाने एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात दि.२२ सप्टेंबर ते दि. ६ ऑक्टोबरपर्यंत पंधरा दिवसांची विशेष तपासणी ...

एसटीत विनातिकीट प्रवास, जागेवरच दुप्पट दंड
सांगली : एसटी महामंडळाने एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात दि.२२ सप्टेंबर ते दि. ६ ऑक्टोबरपर्यंत पंधरा दिवसांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवासी आढळल्यास संबंधितांकडून चुकवलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम वसूल करणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ तिकीट तपासणी मोहीम राबवणार आहे. या मोहिमेत सांगली विभागातील सर्व मार्गांवर तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी तापसणीसाठी सज्ज असणार आहेत. हे सर्व अधिकारी विनातिकीट प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम आणि सोबत जागृतीही करणार आहेत. अनेक ग्रामीण भागातील नागरिकांना बहुदा तिकीट न काढण्याची सवय अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गर्दीत संधी साधून तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडत असून अशा नागरिकांना दुप्पट दंडाच्या स्वरूपात शिक्षा मिळाली तर ते पुन्हा अशा प्रकारच्या वर्तनाला आळा घालतील. या दृष्टिकोनातून ही मोहीम सुरू करण्याचा विचार महामंडळाने केला आहे. यावर विशेष लक्ष देण्यासाठी मंडळाने कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेहमीपेक्षा वेगळे असे संभाषण कौशल्य आणि प्रशिक्षण दिले आहे. राज्यात सर्वच मार्गांवर टप्प्याटप्प्याने ही तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सांगली विभागाचे आगार व्यवस्थापक अरुण वाघाटे यांनी दिली.