शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांकडे, गेली चार महिने सुरु होती चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 16:11 IST

राजकीय हेतूने ही चौकशी होत असल्याचा बँकेतील तत्कालीन संचालकांचा आरोप

सांगली : जिल्हा बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या कथित गैरकारभाराची चौकशी करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार गेली चार महिने पाच लेखा परीक्षकांच्या टीमने चौकशी पूर्ण केली. याचा अहवाल सहकार आयुक्तांना सादर केला आहे. यातून आता काय बाहेर पडणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.जिल्हा बँकेचे तत्कालीन संचालक व विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक व स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी बँकेतील गैरकारभाराबाबात महाविकास आघाडी सरकारच्या काळात शासनाकडे तक्रार केली होती. या प्रकरणी चौकशीचे आदेशही दिले होते. मात्र, नंतर ही चौकशी शासनाने स्थगित केली. दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाला. आघाडी सरकार जाऊन शिंदे - फडणवीस यांचे सरकार आले. या सरकारकडे आ. गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा बँकेच्या चौकशीवरील स्थगिती उठविण्याची मागणी केली. शासनानेही ही स्थगिती उठवून २८ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा बॅँकेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. यासाठी सहकारी संस्था विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच लेखा परीक्षकांची टीम नेमली.चौकशी अधिकाऱ्यांनी गेली जवळपास चार महिने चौकशीचे केली. त्यामध्ये मार्च एंडला खंड पडला. छत्रीकर यांनी नुकताच चौकशी अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला आहे. या  अहवालात काय दडलं आहे? याची आता उत्सुकता लागली आहे. जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनल सत्तेवर आहे. पाटील व पडळकर यांच्यात राजकीय वाद आहे.  राजकीय हेतूने ही चौकशी होत असल्याचा बँकेतील तत्कालीन संचालकांचा आरोप आहे. मात्र, बँकेच्या कारभाराबाबत शासनाकडे तक्रार करणारे तत्कालीन संचालक आ. नाईक हेच आता बँकेचे अध्यक्ष आहेत. चौकशी अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेत तळ ठोकून तक्रार करण्यात आलेल्या मुद्दयांची चौकशी केली. बँकेत तांत्रिक पदाची नोकर भरती केली. चारशे कनिष्ठ लिपिक पदाचीही भरती केली. या दोन्ही भरती प्रक्रियेची चौकशी केली आहे.या प्रकरणांची झाली चौकशी

  • २१ तांत्रिक पदांची, तसेच ४०० लिपिक पदाची नोकर भरती
  • सरफेसी कायद्यांतर्गत थकबाकीदार सहा संस्थांची मालमत्तांची खरेदी
  • मागील संचालक मंडळात शेवटच्या दोन वर्षांत झालेले ठराव
  • केन ॲग्रो, गोपूज साखर कारखान्याला दिलेले कर्ज
टॅग्स :Sangliसांगलीbankबँक