मालवाहतुकीच्या रकमेत गैरव्यवहारप्रकरणी दोषींची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:31+5:302021-09-02T04:57:31+5:30
सांगली : एसटी महामंडळाच्या येवला (जि. नाशिक) आगाराचे चालक आर. एस. सोनवणे यांनी जत आगाराकडे दि. २६ जानेवारी रोजी ...

मालवाहतुकीच्या रकमेत गैरव्यवहारप्रकरणी दोषींची चौकशी
सांगली : एसटी महामंडळाच्या येवला (जि. नाशिक) आगाराचे चालक आर. एस. सोनवणे यांनी जत आगाराकडे दि. २६ जानेवारी रोजी चार हजार रुपये भरले होते. प्रत्यक्षात ते सात महिने उशिरा पैसे जमा झाले. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू झाली आहे. चालक, व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविले आहेत.
चालक सोनवणे दि. २५ जानेवारी रोजी एसटीचा मालट्रक (एमएच २० डी ९९०५) घेऊन मिरज आगारात आले होते. मिरज आगाराने कुपवाड ते जत असा माल भरून येथे पाठविला. या मालवाहतुकीचे चार हजार रुपये भाडे सोनवणे यांना मिळाले होते. त्यांनी जत आगारातील वाहक एस.जी. तंगडी यांच्याकडे जमा केले होते. परंतु, रक्कम मिरज आगाराकडे जमा न झाल्यामुळे वाहतूक नियंत्रक गोरे यांनी येवला आगारप्रमुखांशी संपर्क केला. यावेळी त्यांनी तंगडी यांच्याकडे रोखीने पैसे दिल्याचे सांगितले. नंतर तंगडी यांनी मिरज आगाराचे शाहीद भोकरे यांच्याकडे दि. २० एप्रिल रोजी ऑनलाइन पैसे भरले. या ऑनलाइन पैसे भरल्याची प्रतही एसटीच्या चौकशी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. भोकरे यांच्यासह तंगडी यांनी एसटीकडे महामंडळाच्या खात्यावर उशिरा का पैसे भरले, यामध्ये आणखी कोणी दोषी आहे, या सर्व प्रकाराची पुणे येथील अधिकाऱ्यांनी दोन दिवस चौकशी केली आहे. दोषी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.