समडोळी अपघातातील जखमीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:45+5:302021-04-18T04:25:45+5:30
दुधगाव : समडोळी फाट्याजवळील पेट्रोल पंपानजीक सोमवारी दि. ५ एप्रिल रोजी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जखमी झालेले ...

समडोळी अपघातातील जखमीचा मृत्यू
दुधगाव : समडोळी फाट्याजवळील पेट्रोल पंपानजीक सोमवारी दि. ५ एप्रिल रोजी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जखमी झालेले प्रगतशील शेतकरी बापूसाहेब कल्लाप्पा ढोले (७६) यांचा बुधवार, दि. १४ रोजी मृत्यू झाला.
सोमवार, दि. ५ रोजी सकाळी शेतीला पाणी देऊन सायकल बाजूला लावून रस्ता ओलांडत असताना कवठेपिरानहून सांगलीकडे येणाऱ्या अज्ञात वाहनाने ढोले यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी त्यांना सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. गंभीर अवस्थेतील बापू ढोले यांना उपचारानंतर घरी आणण्यात आले होते. त्यांचे बुधवारी त्यांचे निधन झाले. अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. समडोळीतील पत्रकार सचिन ढोले यांचे ते वडील होत.