शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात 'मल्टीस्पेशालिटी'साठी खासदार सरसावले, रुग्णालय सुरू करण्यासाठी मंत्रालयात होणार बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:56 IST

सहा कोटी तीस लाख रुपये खर्चून उभारलेले हॉस्पिटल धुळखात पडून होते. याबाबत 'लोकमत' मधून आवाज उठवण्यात आला होता.

दत्ता पाटील तासगाव : तासगाव शहरात नगरपालिकेच्या वतीने सव्वा सहा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले, कस्तुरबा गांधी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल तात्काळ सुरू व्हावे यासाठी खासदार संजय पाटील सरसावले आहेत. हॉस्पिटल साठी आवश्यक असणारे डॉक्टर आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून, गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत उपचाराची सोय व्हावी. यासाठी लवकरच मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी खासदारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या बैठकीनंतर रुग्णालय सुरू होऊ शकते. राज्य शासनाकडून निधी मिळवून सहा कोटी तीस लाख रुपये खर्चून तासगाव नगरपालिकेच्यावतीने कस्तुरबा गांधी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. शंभर बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभा राहिले. एक वर्षांपूर्वी या हॉस्पिटलचे लोकार्पण झाले. मात्र वर्षभरानंतर देखील हे हॉस्पिटल धुळखात पडून होते. याबाबत 'लोकमत' मधून आवाज उठवण्यात आला होता. त्याची दखल घेत तासगावातील नेत्यांनी हालचाली गतिमान करून रुग्णालय सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयासाठी तज्ञ डॉक्टर आणि कुशल मनुष्यबळ आणायचे कोठून? त्यांच्या पगाराचा आणि औषधोपचारांचा खर्च भागवायचा कसा? हा प्रश्न अनुत्तरीतच होता. रुग्णालयाची इमारत तयार झाल्यानंतर हे रुग्णालय खाजगी संस्थेमार्फत चालवायचे की नगरपालिकेने स्वतः रुग्णालय चालवायचे? याबाबत चर्चा झाली. मात्र या दोन्ही गोष्टी शक्य नसल्यामुळे रुग्णालयाच्या इमारतीत यापूर्वी असलेल्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथकामार्फत रुग्णालय चालवायचे किंवा मिरज मेडिकल मिरज वैद्यकीय महाविद्यालयाशी हे रुग्णालय संलग्न करून चालवायचे याबाबत चर्चा होत होती. मात्र हे रुग्णालय चालवण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ मिळवणे आणि औषध उपचारांसह कार्यरत कर्मचारी डॉक्टर यांचा खर्च भागवणे या सर्व प्रक्रिया शासन पातळीवरूनच निश्चित होणार आहेत शासन पातळीवरूनच हे रुग्णालय चालवण्याबाबत निर्णय होऊ शकतो. धोरणात्मक निर्णय शक्यशासन पातळीवरती उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, नगरपालिका आणि जिल्हाप्रशासनाच्या मार्फत संयुक्त बैठक घेऊन या बैठकीत रुग्णालय सुरू करण्यासाठी सर्वसमावेशक निर्णय व्हावा, यासाठी खासदार पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच याबाबत बैठक होऊन रुग्णालय सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी होईल. अशी खात्री खासदार पाटील यांनी दिली आहे 

तासगावात शहरासह तालुक्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत उपचाराची सोय व्हावी, याच उद्देशाने तासगाव नगरपालिकेच्या वतीने सव्वा सहा कोटी रुपये खर्चून प्रशस्त रुग्णालय उभारण्यात आले आहे. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत रुग्णालय सुरू करण्याबाबत योग्य तो तोडगा निघेल. - खासदार संजय पाटील.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल