मिरजेतील संशयित रुग्णांची माहिती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:27 IST2021-05-19T04:27:45+5:302021-05-19T04:27:45+5:30
महापालिकेस संशयित रुग्णाची माहिती न दिल्याने परस्पर औषधे घेऊन रुग्ण दगावला व कोरोनाबाधित निघाल्यास महापालिका प्रशासनातर्फे संबंधितावर कारवाई ...

मिरजेतील संशयित रुग्णांची माहिती द्या
महापालिकेस संशयित रुग्णाची माहिती न दिल्याने परस्पर औषधे घेऊन रुग्ण दगावला व कोरोनाबाधित निघाल्यास महापालिका प्रशासनातर्फे संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.
मिरजेतील सर्व औषध दुकानदार व खासगी डॉक्टरांनी कोरोनासदृश रुग्ण दवाखान्यात किंवा औषध दुकानात आल्यास महापालिकेला कळविण्याच्या सूचना दिल्या.
ते म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या सध्या स्थिर असला तरी कमी झालेली नाही. कोरोनाबाधित घरीच औषधोपचार करून कोरोनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर गंभीर होऊन रुग्णालयात दाखल होत आहेत. अंतिम टप्प्यात उपचारात अडचणी निर्माण होऊन रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही काही औषध दुकानदार व खासगी डॉक्टर याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आता महापालिका क्षेत्रातील सर्व औषध दुकानदार व खासगी डॉक्टरांकडे लक्ष देण्यात येणार असून, यापुढील काळात कोरोनासदृश रुग्ण आल्यास महापालिकेस याबाबत कळविणे बंधनकारक आहे. परस्पर औषधे दिल्याने कोरोनासदृश रुग्ण दगावल्यास महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला.