शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापुराने ऊस उद्ध्वस्त झाल्याचा फटका, गुऱ्हाळांच्या चिमण्या थंडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 17:05 IST

महापुराने गुऱ्हाळेही मोडकळीस आली आहेत. दिवाळी संपली तरी गळीत हंगामाची चिन्हे नाहीत. सांगलीला गूळ पाठविणारी कर्नाटकातील गुऱ्हाळेही संकटात आहेत. महापुराने ऊस उद्ध्वस्त झाल्याचा फटका गुऱ्हाळांनाही बसला आहे. त्यामुुळे यंदा गुळाची भाववाढ होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमहापुराने ऊस उद्ध्वस्त झाल्याचा फटकागुऱ्हाळांच्या चिमण्या थंडच

संतोष भिसे सांगली : महापुराने गुऱ्हाळेही मोडकळीस आली आहेत. दिवाळी संपली तरी गळीत हंगामाची चिन्हे नाहीत. सांगलीला गूळ पाठविणारी कर्नाटकातील गुऱ्हाळेही संकटात आहेत. महापुराने ऊस उद्ध्वस्त झाल्याचा फटका गुऱ्हाळांनाही बसला आहे. त्यामुुळे यंदा गुळाची भाववाढ होण्याची शक्यता आहे.सांगलीत कर्नाटकातील रायबाग, अथणी, चिक्कोडी, सौंदत्ती, जमखंडी, हारुगेरी, महालिंगपूर, हिडकल येथून गूळ येतो. यंदा महापुराने तेथील गुऱ्हाळघरे पाण्याखाली गेली, ऊसही बुडाला होता. शिराळा तालुक्यातही अशीच स्थिती होती. तेथील हंगाम तुळशी पौर्र्णिमेनंतर सुरु होतो.

यंदा तो सुरू होण्याची चिन्हे अजूनही नाहीत. पुराने गुऱ्हाळघरांची प्रचंड पडझड झाली. कर्नाटकात हजारो एकर ऊस पाण्याखाली गेला. गेल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू असल्याने गळीत सुरु झाले नाही.

रानात चिखल आणि पाणी साचून असल्याने तोडी ठप्प आहेत. या संकटग्रस्त स्थितीत गळीत कसे सुरु करायचे, हा प्रश्न गुऱ्हाळमालकांपुढे आहे. जुलैपासून सांगली बाजार समितीत गुळाची आवक घटली आहे, त्यामुळे दर देखील तेजीत आहेत.

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली