शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा आगडोंब आणि त्यामध्ये घरगुती गॅस दरवाढीचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महागाईने उच्चांक गाठलेला असताना गॅस दरवाढीने त्यात नवी भर टाकली आहे. १ जुलैपासून घरगुती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महागाईने उच्चांक गाठलेला असताना गॅस दरवाढीने त्यात नवी भर टाकली आहे. १ जुलैपासून घरगुती गॅस सिलिंडर २५.५० रुपयांनी महागला. महिन्याच्या प्रत्येक १ तारखेला गॅस कंपन्या किमतीचा आढावा घेऊन दर कमी - जास्त करतात. त्यानुसार ही दरवाढ झाली आहे.

आतापर्यंत ८०८ रुपयांना मिळणाऱ्या सिलिंडरसाठी आता ८३४ रुपये मोजावे लागणार आहेत. सामान्य गृहिणीचे महिन्याचे बजेट विस्कळीत करणारी ही दरवाढ आहे. गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे उत्पन्न कमी झाले आहे, याउलट महागाई मात्र थांबण्याचे नाव घेईना झाली आहे. विशेषत: इंधनाची दरवाढ मोठी डोकेदुखी ठरली आहे. पेट्रोल शंभरी पार गेली असून, डिझेल शंभरी गाठू लागले आहे. महागाईचा आगडोंब उसळला असताना गॅस दरवाढीने त्यात तेल ओतले आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांसाठी गॅसचा वापर म्हणजे चैन ठरू पाहात आहे.

बॉक्स

गावाकडे पुन्हा चुलींचा धूर

- गॅसची सततची दरवाढ महिलांना पुन्हा चुलीच्या धुराकडे वळवणारी ठरत आहे. गावाकडे लाकूडफाटा सहज उपलब्ध होत असल्याने सिलिंडरचा वापर कमी होऊ पाहात आहे.

- चहा, दूध तापवण्यासारख्या हलक्या कामांसाठीच गॅसचा वापर करण्यासाठी महिलांचे प्राधान्य आहे. सकाळ - संध्याकाळचा स्वयंपाक, आंघोळीचे पाणी यासाठी चुली पुन्हा धगधगू लागल्या आहेत.

- शहरी झोपडपट्ट्यांमध्ये उज्ज्वला योजनेतून गरीब महिलांना मोफत गॅस जोडण्या देण्यात आल्या होत्या. आता सिलिंडर परवडत नसल्याने त्यांनी पुन्हा चुली मांडल्या आहेत.

- सकाळी एकदाच पूर्ण स्वयंपाक करते. संध्याकाळी तोच गरम करून जेवणावळी उरकते. त्यातून गॅसची बचत करण्याचा प्रयत्न असल्याचे गृहिणींनी सांगितले.

बॉक्स

फेब्रुवारी महिन्यात ५३ रुपयांची वाढ

फेब्रुवारी महिन्यातही घरगुती गॅस सिलिंडर ५३ रुपयांनी महागला होता. त्यावेळी लॉकडाऊन शिथिल असल्याने महागाईचा झटका तीव्रतेने जाणवला नाही. जुलैमध्ये सर्वत्र लॉकडाऊन असल्याने उद्योग-व्यवसाय बंद आहेत. या काळात ही दरवाढ तीव्रतेने जाणवणारी ठरली आहे.

ग्राफ

ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये झालेली दरवाढ

ऑगस्ट घरगुती ६११, व्यावसायिक १,१६९

सप्टेंबर घरगुती ६११, व्यावसायिक १,१६९

ऑक्टोबर घरगुती ६११ , व्यावसायिक १,१९३

नोव्हेंबर घरगुती ६११, व्यावसायिक १,२३०

डिसेंबर घरगुती ६८३, व्यावसायिक १,३३२

ग्राफ

जानेवारी २०२१ ते जुलैमध्ये झालेली दरवाढ

जानेवारी घरगुती ७१०, व्यावसायिक १,४५०

फेब्रुवारी घरगुती ७६३, व्यावसायिक १,५७२

मार्च घरगुती ८१०, व्यावसायिक १,६७४

एप्रिल घरगुती ७९५, व्यावसायिक १,७०३

मे घरगुती ७९५ , व्यावसायिक १७०२

जून घरगुती ८०५, व्यावसायिक १७५०

जुलै घरगुती ८३४, व्यावसायिक १६१४

कोट

महागाईने भंडावून सोडले

प्रत्येक महिन्यात १०-२० रुपयांनी गॅसची दवाढ सुरू आहे. शहरी भागात चुलीसारखा पर्यायदेखील नाही. गॅसची बचत पूर्वीपासूनच करत आहोत. दरवाढ स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही हे कळून चुकले आहे.

- रोहिणी कोरे, गृहिणी, सांगलीवाडी

सरकारने लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्याऐवजी गॅस दरवाढ करून महागाईच्या वरवंट्याखाली लोटले आहे. कोरोनामुळे पतीचे उत्पन्न कमी झाले आहे, अन्य खर्च मात्र वाढतच आहेत. खर्च कमी करायचे तरी कशाचे? हेच कळेना झाले आहे.

- जुई घार्गे, गृहिणी, मिरज