शेतीच्या पाईपलाईनला महागाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST2021-04-19T04:23:49+5:302021-04-19T04:23:49+5:30

शेती बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. हिवाळा संपताना अनेक पिकांचा हंगाम संपून जमिनी मोकळ्या होत असतात. ...

Inflation hits agricultural pipeline | शेतीच्या पाईपलाईनला महागाईची झळ

शेतीच्या पाईपलाईनला महागाईची झळ

शेती बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना दरवाढीचा मोठा फटका बसला आहे.

हिवाळा संपताना अनेक पिकांचा हंगाम संपून जमिनी मोकळ्या होत असतात. अशा वेळी शेतकरी जमीनीची डागडुजी करून जमिनी बागायती करण्यासाठी पाईप लाईन व दुरुस्तीची कामे करतात. अशा वेळीच हार्डवेअरमधील शेतीशी निगडित सर्वच वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे शेतीतील मोठी कामे थांबली आहेत. हॉल, साॅकेट, फुटबालसह पाईपशी निगडित वस्तूचे भाव ४० टक्क्यांनी वाढले आहेत. यासह अडीच इंची पाईपचा दर ७००, तीन इंच पाईपचा दर ९७०, तर चार इंची पाईप दर १४०० रुपयांवर पोहोचला आहे.

चाैकट

व्यावसायिकांना फटका

यावर्षी कच्च्या मालाची कमतरता आहे. असे कारण देत कंपन्यांनी भरमसाठ मोठी वाढ केली आहे. याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे. दरवर्षी पेक्षा ४० ते ५० टक्के पाईप कमी खपल्या आहेत. दरवाढीमुळे मोठे शेतकरी पाईप लाईन करण्याचे थांबले आहेत, अशी माहिती व्यावसायिक संतोष जाधव यांनी दिली.

Web Title: Inflation hits agricultural pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.