इंद्रप्रस्थने सर्वसामान्यांना स्वावलंबी बनविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:11+5:302021-02-06T04:47:11+5:30
इस्लामपूर : केवळ ठेवी गोळा करून कर्ज देणे एवढाच मर्यादित हेतू न ठेवता इंद्रप्रस्थ पतसंस्थेने सर्वसामान्यांच्या पाठीशी भक्कम आर्थिक ...

इंद्रप्रस्थने सर्वसामान्यांना स्वावलंबी बनविले
इस्लामपूर : केवळ ठेवी गोळा करून कर्ज देणे एवढाच मर्यादित हेतू न ठेवता इंद्रप्रस्थ पतसंस्थेने सर्वसामान्यांच्या पाठीशी भक्कम आर्थिक ताकत उभी करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचे काम केले आहे, असे गौरवोद्गार संस्थेचे संस्थापक व जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी काढले.
इंद्रप्रस्थ पतसंस्थेच्या २७ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी शाखा विस्ताराची माहिती देत संस्थेकडे ५५ कोटी रुपयांच्या ठेवी असून ४७ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केल्याचे सांगितले. सतीश पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, सुश्मिता जाधव, नगराध्यक्षा स्नेहा माळी, जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक जयवंत कडू-पाटील, जयसिंगराव शिंदे, उज्ज्वला पाटील, प्रा. रमेश कदम, अख्तर पीरजादे, आनंदराव सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक कमल पाटील यांनी आभार मानले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास धस, बाळासाहेब पाटील, मोहनराव शिंदे, उद्योजक विजयकुमार पाटील, संग्रामसिंह पाटील, प्रसाद तगारे, अमोल गुरव, सुहास घोरपडे, जयकर नांगरे-पाटील, रोझा किणीकर, अधिक चव्हाण, सुहास हांडे उपस्थित होते.
फोटो -०४०२२०२१-आयएसएलएम-इंद्रप्रस्थ न्यूज
इस्लामपूर येथील इंद्रपस्थ पतसंस्थेच्या कार्यक्रमात दिलीपराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विजय पाटील, बाळासाहेब पाटील, जयकर पाटील, सतीश पाटील, स्नेहा माळी, कमल पाटील उपस्थित होत्या.