दिघंचीत वाढला फळांचा खप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:23 IST2021-01-18T04:23:42+5:302021-01-18T04:23:42+5:30

दिघंची : आटपाडी तालुक्यातील दिघंची गाव सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेलगत असल्याने या ठिकाणी नेहमीच नागरिकांची ...

Increased fruit consumption in the long run | दिघंचीत वाढला फळांचा खप

दिघंचीत वाढला फळांचा खप

दिघंची : आटपाडी तालुक्यातील दिघंची गाव सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेलगत असल्याने या ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. यामुळे गत काही दिवसांमध्ये फळांच्या विक्रीत वाढ झाल्याने अनेकांना रोजगार मिळाला आहे.

तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून दिघंचीची ओळख आहे. या ठिकाणी विविध आजारांवर उपचारासाठी रुग्णालयांची सोय आहे. या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमुळेही फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच कोरोनाच्या भीतीमुळे सर्वसामान्य नागरिक देखील फळांचे सेवन करीत आहेत. केळी, सफरचंद, संत्री, मोसंबी या फळांनाही मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

कोटो

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून फळांना चांगली मागणी आहे. डॉक्टरही फळे खाण्याचा सल्ला देत आहेत. केळी, सफरचंद, पपई ही फळे उपलब्ध होत आहेत. किवी हे फळ बाहेरून मागवावे लागत आहे. ८० ते १०० रुपयांना किवीचे तीन फळांचे बॉक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

- वसंत ढोक, फळ विक्रेते

Web Title: Increased fruit consumption in the long run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.